ऑनलाईन लोकमतविरूळ (आकाजी) : खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले. किमान कुटारातून आर्थिक नुकसान कमी करता येऊ शकेल म्हणून शेतकऱ्यांनी ते जपून ठेवले; पण ते कुटारही शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. कुटारामुळे घरात अळ्या झाल्याने उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.गावातील वासुदेव चाफले यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार शेजारी रामदास खेलकर यांच्या भिंतीलगत ठेवले होते. हे कुटार गुरांना खाद्य म्हणून उपयोगी पडेल म्हणून ठेवले होते; पण काहीच दिवसांत त्या कुटारात अळ्या, उडदे झाले आहेत. या कुटारातील उळ्या खेलकर यांच्या घरात सर्वत्र पसरल्या आहेत. या अळ्या जेवणात, पाण्यात पडत असल्याने कुटुंबीय त्रस्त आहे.
सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:04 IST
खरीप हंगामात सोयाबीनने दगा दिला. उत्पन्न घटल्याने नैराश्य आले. यानंतर कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केल्याने नुकसान सोसावे लागले.
सोयाबीनचे कुटार ठरतेय शेतकऱ्यांना घातक
ठळक मुद्देघरामध्ये झाल्या अळ्या : उघड्यावर स्वयंपाक व जेवण करण्याची वेळ