शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सणोत्सव; ड्रायफूडचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:51 IST

नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दिवाळीदरम्यान ही दरवाढ अधिक गतिमान होईल, असे चित्र आहे.सणावाराला आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्यामेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. परंतु, यंदा या परंपरेला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. काजू, बदाम, खारीक, अक्रोड या जिन्नसांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेत सुक्यामेव्याची विक्री घटण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यापासून विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन, दिवाळी आदींचा समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये दिवाळीच्या फराळात सुक्यामेव्याचा वापर वाढला आहे. पण, यासोबतच सुकामेवा भेट म्हणून देण्यालाही विशेष महत्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह, ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळते. परंतु, दरवाढीमुळे यंदा हे चित्र बदललेले दिसू शकते. आपल्याकडे येणारा सुकामेवा हा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमार्गे येतो. भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबविल्यामुळे अफगाणिस्तानातून येणारी सुकामेव्याची आवक प्रभावित होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.यामध्ये प्रामुख्याने खजूर, खारीक, अक्रोड, बदाम यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकामेव्याच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत दर अधिक वाढल्यास त्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.किसमिस आवाक्यातसुकामेव्यातील किसमिस हा पदार्थ बाहेर देशातून तसेच नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येतो. आपल्याकडे नाशिक येथून येणाऱ्या स्थानिक किसमिसला चांगली मागणी असते. त्यामुळे किसमिसचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. तर खारिकचे दर दुप्पट झाले आहेत. १७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी खारिक आता ३५० रुपयांना विकली जात आहे.