शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रहारने केली सातबाराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:23 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोरील आंदोलन : शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ जिल्हाकचेरीसमोर सातबाराची होळी केली.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली;पण अंमलबजावणी झाली नाही. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर व संत्रा पिकाचे मोठे नुकसान केले. या संकटातून सावरण्यापूर्वीच बोंडअळीने कपाशी उत्पादकांच्या अडचणी वाढविल्या आहेत. बोंडअळीमुळे उत्पादनातही घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यासर्व संकटामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट एकरी २५ हजार रूपयाची शासकीय मदत द्यावी. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाखाची मदत द्यावी. शिवाय कृषीपंपाचे विद्युत देयक माफ करून शेतकºयांना २४ तास विद्युत पुरवठा करावा. सोयाबीन व तूर उत्पादक शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपयाचे अनुदान द्यावे. स्वामिनाथन आयोग लागू करावा. पेरणी ते कापणीपर्यंत शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनातून प्रहार जनशक्ती पक्षाच्यातर्फे आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. आंदोलनात गजू कुबडे, देवा धोटे, राजू बोभाटे, आदित्य कोकटवार, प्रमोद कुऱ्हटकर, हनुमंत झोटींग, विकास दांडगे, मिलिंद गोमासे, अंकीत दांडेकर, प्रमोद मस्के, अमोल येंडे, रूपराज भगत, बिट्टू रावेकर, राजू सावरकर, सोनू काजी, शैलेश सहारे, महेश साहू, खोंडे, रजत डंभारे, भोयर, लोहभवरे, वैद्य आदी सहभागी झाले होते.