शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:39 IST

अखिल भारतीय सर्वधर्म कौमी एकता समितीच्यावतीने सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या चमूला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मातोश्री वृध्दाश्रमात नुकताच करण्यात आला.

ठळक मुद्देसर्वधर्म कौमी एकता समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय सर्वधर्म कौमी एकता समितीच्यावतीने सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या चमूला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मातोश्री वृध्दाश्रमात नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेचे ठाणेदार चंद्रकांत मदने, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, रामनगरचे ठाणेदार चौधरी, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बारई, विशाल कोसे, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, डॉ. अमित कुमार आदी उपस्थित होते.केरळ पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची चमू बारा दिवस केरळ राज्यात गेली होती. या चमूला औषध व रोख आर्थिक मदत वर्धा शहरातील सामाजिक संघटनांनी केली. या संघटनांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वर्धा जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वर्धा, सावंगी, रामनगर, स्थानिक गुन्हे शाखा यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, युवा सोशल फोरम, मिलिंद गांधी, अंकुर जैन व व्यापारी मित्र यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कौमी एकता समिती अध्यक्ष गुड्डु अली, गिरीष चवडे, मिलिंद गांधी, अ‍ॅड. असद खान, आबिद खान, गुड्डु पठाण, सलामभाई, अनमद, बाबा जाकीर, वैशाली नगराळे, इंगोले, गुंफा आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. पावडे म्हणाले की देवाच्या नंतर सर्वसामान्य लोकांना डॉक्टरवर सर्व विश्वास असतो. नागरिकांनी सुध्दा जनसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे, असे विचार मांडले. यावेळी मदने यांनी पोलीस प्रशासन अशा सामाजिक कार्यात तत्परतेने मदत देण्यासाठी सदैव पुढाकार घेईल, असे सांगितले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर