शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रक्तदानामागची भावना लाखमोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:15 IST

आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपकरणे निर्माण करता येतात. मात्र, रक्ताची भरपाई कृत्रिमरित्या करता येत नसल्याने ती पुर्णत: मानवी दातृत्वावर अवलंबून आहे. आपण नि:स्वार्थपणे करीत असलेल्या रक्तदानामागील भावना ही लाखमोलाची असून त्याची किंमत ठरविता येत नाही, ......

ठळक मुद्देसुभाष देशमुख : रक्तदात्या संस्थांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपकरणे निर्माण करता येतात. मात्र, रक्ताची भरपाई कृत्रिमरित्या करता येत नसल्याने ती पुर्णत: मानवी दातृत्वावर अवलंबून आहे. आपण नि:स्वार्थपणे करीत असलेल्या रक्तदानामागील भावना ही लाखमोलाची असून त्याची किंमत ठरविता येत नाही, असे उद्गार अमेरिकेत कार्यरत सुप्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. सुभाष देशमुख यांनी काढले. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आयोजित रक्तदात्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रक्तपेढी व विकृतीशास्त्र विभागाद्वारे रक्तदान शिबिर आयोजकाचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर्युर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे होते. यावेळी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद भाके, रक्तपेढी प्रमुख डॉ. किशोर हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, राजकीय हेवेदावे विसरून अंत्यत प्रामाणिकपणे गरजू रुग्णांसाठी वेळोवेळी रक्त उपलब्ध करून देणारे रक्तदाते आणि संस्थांच्या कार्याचा गौरव करीत दत्ता मेघे यांनी संस्थेच्यावतीने ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते स्वत:च्या लग्नात रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे किन्ही समुद्रपूर येथील देवा धोटे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, भाजपचे शहराध्यक्ष सुनील बुरले, बजरंग दलाचे, अटल पांडे, संजय बडगिलवार, अजय राठी, शिवसेनेचे अनंत देशमुख, मनसेचे डॉ. चौधरी, प्रहारचे विकास दांडगे, प्रविण हेडवे, नगरसेवक वरूण पाठक, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सुमीत गांजरे, दर्शनाचे फादर टामी, रोटरीचे डॉ. जयंत मकरंदे, उत्तम कृपलानी, राजेंद्र झोटींग, सागर युवा मंचाचे संदीप कुत्तरमारे, उत्तम गाल्वाचे सुरक्षा अधिकारी एस. पटनायक, टायगर ग्रुप सेलूचे धनंजय दंडारे, जिव्हाळाचे अतुल पालेकर, किशोर वागदरकर, क्षत्रिय मराठा परिषदेचे सुनील अंभोरे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. भुतडा, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गंजीवाले, आदर्श महाविद्यालयातील डॉ. नागपुरे, रूपेश डहाके, धामणगाव (रेल्वे) येथील डॉ. कुरेशी, कवठा, समुद्रपूर येथील प्रविण जायदे, अ‍ॅड. जाचक, राज्य विद्युत महामंडळातील दिलीप तडस, वेस्टर्न कोल लि. चे मनोहर टिपले, प्रविण पेटकर, आनंद चांडक, डॉ. अक्षता शर्मा, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. शैलेश केडिया, हरीश काचोरे, डॉ. प्रमिता मुनतोडे, डॉ. पंकज घरडे, डॉ. हरणे, वीरेंद्र मोहतानी, कार्तिक फुटाणे, हिंगणघाटचे प्रा. केदार, संजय मोहता, राजेश बोभाटे, वर्धमनेरी येथील नांदुरकर, दीपक आहुजा या रक्तदात्यांचा तसेच रक्तदान शिबिरांच्या आयोजकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. किशोर हिवाळे यांनी केले. संचालन रक्तपेढी तंत्रज्ञ जगदीश देशमुख यांनी केले. आयोजनात डॉ. सुनील चावरे, डॉ. सुप्रिया गोमासे दांडगे, राजेश देशमुख आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Datta Megheदत्ता मेघेSubhash Deshmukhसुभाष देशमुख