शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

कुऱ्हाडीने वार करून बापानेच मुलाला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

आजनसरा येथील अरुण काचोळे यांना दोन मुले आहेत. अरुण हा पत्नी व मुलांसोबत राहत असला तरी त्याला दारूचे व्यसन आहे. मद्यधुंद अवस्थेत अरुणचे कुटुंबीयांसोबत नेहमीच खटके उडायचे. याच त्रासाला कंटाळून प्रमोद हा मागील दोन वर्षांपासून गावातच भाड्याच्या घरात राहत होता.  प्रमोद हा शेती, मालवाहतूक व पानटपरीच्या व्यवसायातून कुटुंबाचे पालन-पोषण करायचा.  

ठळक मुद्देपोलिसांनी केली आरोपीस अटक : आजनसरा परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कआजनसरा : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन बापाने विवाहित मुलावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यास गतप्राण केले. ही घटना आजनसरा शिवारात घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. प्रमोद काचोळे (३०) असे मृतकाचे, तर अरुण काचोळे (५६) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.आजनसरा येथील अरुण काचोळे यांना दोन मुले आहेत. अरुण हा पत्नी व मुलांसोबत राहत असला तरी त्याला दारूचे व्यसन आहे. मद्यधुंद अवस्थेत अरुणचे कुटुंबीयांसोबत नेहमीच खटके उडायचे. याच त्रासाला कंटाळून प्रमोद हा मागील दोन वर्षांपासून गावातच भाड्याच्या घरात राहत होता.  प्रमोद हा शेती, मालवाहतूक व पानटपरीच्या व्यवसायातून कुटुंबाचे पालन-पोषण करायचा.  एक वर्षांचा मुलगा असलेला प्रमोद हा शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतात असताना तेथे अरुण हा मद्यधुंद अवस्थेत आला. शिवाय तो प्रमोदला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करण्यास हटकले असता अरुणचा पारा चढला. दरम्यान, अरुण याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने प्रमोदवर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. प्रमोदचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात असलेले चाफले हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती प्रमोदचा भाऊ विनोद याला दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी प्रमोदला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने प्रमोदला सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात आरोपी अरुण काचोळे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अरुण काचोळे याला ताब्यात घेऊन अटक केली असून, पुढील तपास हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात वडनेरचे ठाणेदार शेट्टे, पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपित्तरे, अजय वानखेडे, लक्ष्मण केंद्रे, प्रवीण बोधाने, विनोद राऊत करीत आहेत.

आरोपी दारूपिण्याच्या सवयीचा; नेहमी व्हायचे तंटेया प्रकरणातील आरोपी अरुण काचोळे हा नेहमी दारू पिण्याच्या सवयीचा होता. इतकेच नव्हे तर त्याच्या मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्यावर कुटुंबीयांसांबत त्याचे नेहमीच तंटे व्हायचे. असाच काहीसा तंटा शनिवारी झाला. पण हा शाब्दिक वाद विकोपाला जावून आरोपीने चक्क मुलालाच कुऱ्हाडीने मारून जीवानिशी ठार केले, हे विशेष. 

 

टॅग्स :Murderखून