शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चण्यासाठी शेतजमीन ओके; पण खुर्चीतून गुरगुरताहेत कृषीचे बोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 21:51 IST

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : चण्यासाठी जमीन ओके असल्याचे कृषि तज्ज्ञांकडून बोलले जात असले तरी खुर्चीत बसून कृषी विभागाचे बोके सध्या गुरगुरत  असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली. पण अनेक शेतकऱ्यांना चणा की गव्हाची लागवड करावी, असा प्रश्न सतावत आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. पण कृषी विभागाचे निगरगठ्ठ अधिकारी खुर्चीत बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांमधील पीक लागवडीबाबतच्या समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर या सांभाळत आहेत. पण त्यांनाही या दोन्ही पदाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वर्धा येथे कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्याची गरज आहे.

चणा पिकालाच दिली जातेय पसंती- जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८० टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची २९१ हेक्टरवर, ७१९ हेक्टरवर गहू, ६३ हेक्टरवर मका तर ८ हजार ८० हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या आकडेवारीवरून शेतकरीही यंदा चणा पिकाला पसंती देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मातीत बऱ्यापैकी ओलावा आहे. यंदा रब्बीतील चणा पिकासाठी उत्तम आहे. चणा पीक विना मशागत घेता येते. पण शेतातील गवत काढणे गरजेचे आहे. चणा पिकाला दोन किंवा तीन वेळा सिंचनाची गरज असते. तर गहू पिकाला किमान चार वेळा सिंचनाची गरज असते. शिवाय जमिनीची मशागतही करणे क्रमप्राप्त असते.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती