शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: July 24, 2016 00:21 IST

नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे.

योग्य मोबदला गरजेचा : शेती गेल्यास रोजगाराचा प्रश्न विरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे. या महामार्गकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे. परिणामी, शेतकरी आतापासूनच चिंतेत दिसताहेत. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने हाल केले आहेत. ही बाब आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मग, महामार्गासाठी आपल्या जमिनी गेल्या व योग्य मोबदला मिळाला नाही तर धरणग्रस्त शेतकऱ्यांसारखे आपले हाल होतील, अशी भावना शेतकरी व्यक्त करतात. ‘नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील महामार्ग’ अशी नव्याने तयार होणाऱ्या मार्गाची ओळख असल्याची चर्चा आहे. नागपूर ते मुंबई ८ तासांत या महामार्गाने पोहोचता येणार आहे. हा मार्ग सहा पदरी राहणार आहे. जाण्यासाठी ३ लेंथ, येण्यासाठी ३ लेंथ महामार्गात राहणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण असून ४० किमीच्या अंतरात कोणताही थांबा राहणार नाही. नागपूरातून निघणारा हा मार्ग सेलू, वर्धा, आर्वी व पूढे धामणगाव रेल्वे तालुक्यातून पूढे जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याची चर्चा आहे. जमिनी गेल्या तर काय होईल, या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे. या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर ठिक, नाही तर धरणग्रस्तांप्रमाणे हाल होतील, अशी चर्चा आहे. शासनाने खरेदी केलेल्या जमिनीला चांगला मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण शासनाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(वार्ताहर) याबाबत शासनातर्फे सध्या तरी कोणतीही परिपत्रक आले नाही. केवळ आर्वी तहसील अंतर्गत रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हे क्रमांक गोळा करण्यास सांगितले आहे. - मनोहर मानकर, तलाठी, ग्रा.पं. विरूळ, सोरटा.