शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बी.टी.वरील संशोधनाअभावी शेतकरी आत्महत्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:20 IST

बीटी कॉटनच्या निर्मितीला १५ वर्ष होऊन त्यात कुठल्याही प्रकारचे नवीन जिन्स टाकून नवीन वाण निर्मितीचे कार्य करण्यात आले नाही.

ठळक मुद्देकिशोर किनकर : महाकाळ येथे शेतकरी स्वतंत्र्य कृती समितीची स्थापना

आॅनलाईन लोकमतवर्धा : बीटी कॉटनच्या निर्मितीला १५ वर्ष होऊन त्यात कुठल्याही प्रकारचे नवीन जिन्स टाकून नवीन वाण निर्मितीचे कार्य करण्यात आले नाही. बीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी हे काम न केल्यामुळे कापूस उत्पादन क्षमता घटली. शेतीचा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला व आत्महत्या वाढल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले;पण कृषी प्रधान देशात शेतकरी अजूनही स्वतंत्र झाला नाही. या स्वातंत्र्यासाठी नवी क्रांती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिव ब्रह्मांड राष्ट्रधर्म रक्षक दलाचे प्रमुख किशोर किनकर यांनी केले.ब्रह्मांड पुराणम ऐक्य मंदिर विकास ट्रस्टच्यावतीने गुरुवारी महाकाळ येथे शिव ब्रह्मांड राष्ट्रधर्म रक्षक दलाची स्थापना करण्यात आली. तसेच शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीची कार्यकारीणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. या समितीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकºयांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जनआंदोलन व शेतकरी जागृती कार्यक्रम करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या मालाच्या हमीभावाचे पूर्णमुल्यांकन करणे, कापूस १८ हजार रूपये भावाची मागणी करणे, बोंडअळी आल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई व बी.टी. कॉटन बियाण्यांवर संशोधन करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. शासनाने कंपन्यांना नवीन जिन्स टाकून संशोधनासाठी परवानगी का दिली नाही, असा प्रश्न या बैठकीत शेतकºयांनी केला. शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतमालाच्या भावाबाबत धोरण ठरविण्यासाठी वर्धा येथे १५ डिसेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यमुना लॉन येथून सकाळी ११ वाजता निघुन शिवाजी चौक, बजाज चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक होत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाहोचणार आहे. मोर्चाचे नेतृत्व किशोर किनकर करणार आहे. बैठकीत महाकाळ येथील कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात अध्यक्ष सुरज गोहो, उपाध्यक्ष प्रकाश मोहिते, सचिव अमोल चौधरी, कोषाध्यक्ष शैलेश कारामोरे, उपाध्यक्ष रमेश चारभे, नागेश थोटे, सहसचिव लोकेश ठाकरे तर सदस्य म्हणून सचिन पोडे, देवराव खेडेकर, संजय डोंगरे, भीमराव नाखले यांचा समावेश आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राजेश धोटे व शरद कांबळे यांनी केले आहे.दहा हजार शेतकरी उभारी मोर्चात सहभागी होणारसंपूर्ण जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर झाला आहे. यामागची कारण जाणून घेण्यासाठी किशोर किनकर विदर्भाचा दौरा करीत आहे. व गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५डिसेंबर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात १० हजार शेतकरी सहभागी होतील.