शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:22 IST

कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीतून मोर्चा : भारनियमनासह रेटल्या विविध मागण्या

आॅनलाईन लोकमतवर्धा : कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून दुपारी शेतकºयांचा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारनियमनासह वेळापत्रकात तात्काळ बदल करण्यात यावा यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेला मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना महावितरणच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनाची माहिती महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आली. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यावेळी कार्यालयात गैरहजर असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे सदावर्ते व उरकुडे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी शेतकरी संघटनेच्यावतीने अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्ह्यातील विविध भागात महावितरणच्यावतीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे किंवा शेतकºयांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सोईचे होईल, अशा पद्धतीने भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, जिल्ह्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, थकबाकी असल्याचे कारण पूढे करून कृषीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, अनेक शेतकºयांना सरासरी काढून विद्युत देयके दिली जात आहेत. महावितरणच्या कर्मचाºयांकडून प्रत्येक कृषी मिटरचे रिडिंग घेत शेतकºयांना योग्य देयके देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.आंदोलनात मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, उल्हास कोटंबकर, सचिन डाफ, अरविंद बोरकर, राऊत, शांताराम भालेराव, प्रकाश जिकार, खुशाल हिवरकर, प्रमोद तलमले, मंगेश मानकर यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.