शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये

By admin | Updated: November 11, 2016 01:55 IST

कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही,

शैलेश नवाल : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची बैठक वर्धा : कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही, यासाठी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची बैठक जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी घेतली. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे याबाबत यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास शासनाने बंदी केली आहे. अडत व्यापाऱ्यांकडूनच घेण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिलेत. कृषी उत्पन्नाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी. वैद्यमापन शास्त्र निरिक्षकांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वजनांची तपासणी करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. शेतकऱ्यांना सर्व कृषीमालाचे रोजचे दर माहित व्हावेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिजीटल बोर्ड लावावेत व त्यावर रोजचे दर प्रदर्शीत करावेत. सेंद्रिय पध्दतीने उत्पादित कापसासाठी जास्त दर मिळेल यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सेंद्रीय कापसाचा वेगळा ढीग लावण्याची व्यवस्था करावी. सध्या २८ हजार शेतकरी सेंद्रिय पध्दीने कापूस उत्पादन करीत आहेत. आर्वी, सिंदी आणि हिंगणघाट येथे बीसीआय विक्री केंद्र सुरू करणार आहेत. आहे. याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. कृषी समन्वीत विकास प्रकल्प, महाराष्ट्र शासन आणि बजाज फांऊडेशन हे सेंद्रीय कापूस असल्याचे प्रमाणित करून देतील, अशी माहिती प्रणव पाटील यांनी दिली. या बैठकीला सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक जयंत तलमले, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)