शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:40 IST

हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले.

ठळक मुद्देप्रशांत उंबरकर : हरबरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत सालोड व सेलसुरा येथे तुर व हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.तूर पीक सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे;पण शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव पिकावर दिसून येत आहे. तूर उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. रूपेश झाडोदे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आर. व्ही. चनशेट्टी, किडनियंत्रक विनोद जाधव, नाजुका इरपाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तूर व हरभरा पिकावर हेलिकोव्हर्पा आणि शेंगमाशी या मुख्य किडांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्याकडून शेतकºयांचे मोठे नुकसान केले जाते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी. हरभरा पिकामध्ये हेक्टरी ५० प्रमाणात इंग्रजी टी आकाराचे पक्षी स्थानके उभारावी. शिवाय शेतातील प्रथम व द्वितीय अवस्थेतीत अळ्यांसाठी प्रती हेक्टरी एच. ए. एन. पी. व्ही. ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकांचा शेतकऱ्यांना वापर करावा. तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी व हरभºयावरील घाटेअळी नियंत्रणासाठी क्लोरॅट्रेनिलिपोल १८.५ एस. सी. २.५ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस. जी ३ ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुरीवरील शेंगमाशीसाठी मोनोक्रॉटोफॉस ३६ एस. एल. ११ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ई. सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे यावेळी सांगण्यात आले. यंदा कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे कटाक्षाने टाळावे. पीक डिसेंबर, जानेवारी अखेर काढून टाकावे. पराट्या व न उघडलेले बोंड आदीचे शेताबाहेर कंपोस्ट तयार करावे आणि शेत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जी. आर. कापसे यांनी केले.बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सांगितले उपायसदर उपक्रमादरम्यान तज्ज्ञांनी तूर व हरबरा उत्पादक शेतकºयांना विविध विषयाची माहिती दिली. यावेळी जी. आर. कापसे यांनी भविष्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा कपाशी उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागू नये याविषयी उदाहरणे देत सोप्या शब्दात माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.