शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी खताची बॅग आणि देयकावरील किंमत तपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:15 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : रासायनिक खताच्या किंमतीत तफावतीचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना देयकावरील किंमत व खताच्या बॅगवरील किंमती तपासून घ्याव्या, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.यंदा राज्यात वेळेवर मान्सून येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून खत आणि बियाणे खरेदी सुरू झालाी आहे. गत हंगामात आलेल्या अनुभावावरून यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तसाच प्रकार रासायनिक खतांच्या खरेदीत होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषी केंद्रात रब्बी हंगामातील खताचा साठा आहे. यात नवा साठा येणार आहे. या काळात शासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे खतांचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे या दरात तफावत राहणार असल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने वर्तविला आहे.यामुळे खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून मिळाणाऱ्या देयकात आणि मिळालेल्या खताच्या बॅगवरील किमती सारख्या असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करण्याच्या सूचना कृषी विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.जिल्ह्याला २२,५२० मेट्रीक टन खताची गरजयंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. याकरिता शेतकºयांकडून नित्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर होणार आहे. जिल्ह्याला २२ हजार ५२० मेट्रीक टन खताची गरज असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यात युरिया ३६ हजार ५००, डिएपी ६ हजार ८६०, एमओपी ३ हजार आणि एसएसपी ६ हजार ९१५ मेट्रीक टन खताची गरज आहे. या व्यतिरिक्त इतर खतांची मागणी शेतकºयांकडून होणार आहे.खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बी-बियाणे आणि खतांचा साठा करण्यात येत आहे. यात कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत गंडा बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.- आर.पी. धर्माधिकारी, कृषी विकास अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी