शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदोरी येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:10 IST

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी चौकात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता प्रहार पक्षाच्यावतीने सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : हायमास्ट लाईट व गतिरोधकाची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी चौकात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता प्रहार पक्षाच्यावतीने सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी हायमास्ट लाईट व आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली.आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेले गतिरोधक पुर्णत: सपाट झाले आहेत. नेहमीच येथे अपघात होत असतात. गत पंधरवड्यातच या ठिकाणी नंदोरीतील एका युवकाचा भरधाव कारने बळी घेतला. सदर ठिकाणाहून जड तथा कार व इतर वाहने भरधाव ये-जा करीत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. शिवाय या परिसरात रात्रीच्या सुमारास काळोख राहत असल्याने येथे हायमास्ट लावण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ही मागणी आताचीच नव्हे तर सदर मागणीचे निवदेन यापूर्वी म्हणजे २९ मे रोजी समुद्रपूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. परंतु, त्यांनीही मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी सदर आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. नंदोरी चौकात करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनादरम्यान नंदोरी चौकात आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे तसेच हा परिसर प्रकाशमान राहावा यासाठी चौकात आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट लावण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांसह ठाणेदारांना सादर करण्यात आले.सदर निवेदन महादूरे व मंडळ अधिकारी चौधरी यांनी स्विकारले. आंदोलनात देवा धोटे, खेमलाल झगराह, चिंतामण धोटे, सतीश पिठाडे, प्रवीण बोरुटकर, सुधाकर साटोणे, प्रवीण जायजे, अमीत धुमाळ, बंटी पंचोडबरीया, सुरेश शंभरकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप