शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आरक्षणाचा चेंडू आता पंतप्रधानांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:01 IST

देशात सगळीकडे आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे, त्यातच मागील दोन वर्षांपासून असलेली शेतकरी आरक्षणाची मागणी आता थेट देशाच्या पंतप्रधानांकडे पोहचविण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी निर्णय अपेक्षित ६१ ग्रामपंचायतींच्या ठरावासह प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात सगळीकडे आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे, त्यातच मागील दोन वर्षांपासून असलेली शेतकरी आरक्षणाची मागणी आता थेट देशाच्या पंतप्रधानांकडे पोहचविण्यात आली आहे.नेरी पुनर्वसन, टाकळी (किटे), खुबगाव, बोंडसुला, दहेगाव, नेरी मिझार्पूर यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत घेतलेले शेतकरी आरक्षणाचे ठराव पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या ठरावांसह किसान आरक्षणाच्या संपूर्ण प्रस्तावाचे हिन्दी भाषांतर पंतप्रधान कार्यालयाला पाठिवण्यात आले आहे. येत्या १५ आॅगस्टला भाषणातून मोदींनी याबाबत बोलावे अशी इच्छाही काही सरपंचांनी पीएमओ कार्यालयाकडे पाठविली आहे. आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभेत राज्यभरातील असंख्य ग्राम पंचायती शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव घेणार असून या ठरावांच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना देखील पाठविणार आहेत.शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी जातविरहित व जातीय आरक्षणापेक्षा वेगळी सैनिकांना मिळणाऱ्या आरक्षणाशी मिळती जुळती ही संकल्पना महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही पटते आहे. काही पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही शेतकरी आरक्षणाचे ठराव पारित केले आहेत. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये हा प्रस्ताव पोहचला असून तेलंगणा राज्याने यातील काही मागण्यांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयोगही केला आहे.प्रस्तावाच्या प्रती राज्यातील सर्वच मंत्र्यांना दिल्या असून यावर ग्राम पंचायतींनी ग्रामसभेचे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव पारित करून शासनाला पाठवून या मागणीला बळकटी दिली आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्णता व स्थैर्य देणारे त्यांची सामाजिक, आर्थिक, व्यवहारिक, शैक्षणिक उन्नती करण्यासाठीच्या उपाय योजनांसह शेतीतील अर्थक्रांती घडविण्यासाठी उपाय शेतकरी आरक्षण प्रस्तावात देशापुढे मांडले आहेत.

शेतकरी आरक्षणाच्या संकल्पनेत शेतकऱ्यांसाठी बँकिंग पॉलिसीमध्ये सुचविलेले बदलच पर्याय आहेत. या व्यतिरिक्त प्रस्तावात शेतकऱ्यांच्या आश्वस्त रक्षणासाठी व कृषीतील दीर्घकालीन विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, शेतीपूरक व्यावसायिकांच्या, विद्यार्थ्यांच्या व शेतीवर अवलंबून असलेल्या इतर समाज घटकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे मार्ग सुकर करणारे उपाय सुचविले आहेत.- शैलेश अग्रवाल, प्रणेते एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :Farmerशेतकरी