शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आंतरराष्ट्रीय बाजारात रुई आणि सरकीच्या दरात वाढ झाल्याने विदर्भाच्या बाजारात कापसाला नऊ हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा अडीच हजार रुपयांहून अधिकचा दर क्विंटलमागे मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे.आर्वीची बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे इंग्रजांच्या ब्रिटिश काळात येथील कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी आर्वी-पुलगाव शकुंतला गाडी १९१७ मध्ये सुरू केली होती. येथून हा कापूस पुलगावला आणि तिथून रेल्वेने हा कापूस कोलकात्याला जायचा आणि कोलकात्यावरून हा कापूस इंग्रज आपल्या देशात घेऊन जायचे. आजही विदर्भातील प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टीने पिकांना जबर फटका बसला होता. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामुळे बोंडे सडली होती, जी काही कपाशी बचावली त्यातून उत्पादन सुरू होते. त्यानंतर पुन्हा शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यात यंदा कापसाचे उत्पादनात घट झाली आहे व इतर ठिकाणीही कपाशीला पावसाचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर्षी कापूस उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट झाली आहे, त्यामुळे कापसाला सर्वाधिक दर मिळत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्वी विभागात १८ जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत, तर कापूस खरेदी करणारे ३० ते ३५ व्यावसायिक असल्याने कपसाचीही आवक वाढली आहे. 

सध्या तरी कापसाचा मिळणारा भाव समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; पण भाव पुन्हा वाढणार, की कमी होणार, हे सांगणे कठीण आहे.         रामभाऊ केणे,शेतकरी

 

टॅग्स :cottonकापूस