शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

शेतकऱ्यांचे दूध खरेदीस संघाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून खरेदी करण्यात येते. मात्र, दूध खरेदी करताना अनेक जाचक नियम लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शनिवारी सेलू तालुक्यातील विविध दूध संघानी दूध विक्रीसाठी वर्धा येथील संघाच्या कार्यालयात आणले. परंतु, येथील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूध योग्य नसल्याचा निर्वाळा देत खरेदी करण्यास नकार दिला.

ठळक मुद्देआमदारांची दूध संघाच्या कार्यालयाला भेट । अधिकाऱ्यांना दिल्या दूध खरेदीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यास टाळाटाळ होत असल्याने आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दूध संघाच्या कार्यालयाला शनिवारी भेट देत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्व शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यात यावे. नाममात्र कारण दाखवून दूध परत पाठवू नये, अशी सूचना केली.जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून खरेदी करण्यात येते. मात्र, दूध खरेदी करताना अनेक जाचक नियम लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शनिवारी सेलू तालुक्यातील विविध दूध संघानी दूध विक्रीसाठी वर्धा येथील संघाच्या कार्यालयात आणले. परंतु, येथील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूध योग्य नसल्याचा निर्वाळा देत खरेदी करण्यास नकार दिला. सेलू तालुका दूध संघाचे अध्यक्ष व सेलू नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष राजेश जयस्वाल यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हा प्रकार आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निर्दशनास आणून दिला. आ. भोयर यांनी तातडीने दूध संघाचे एमआयडीसीतील कार्यालय गाठून जयस्वाल यांच्या समवेत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जयस्वाल यांनी दूध संघाच्या कार्यालयात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची माहिती दिली. तथापि, आमदार डॉ. भोयर यांनी संबधित अधिकाऱ्यांनी जाब विचारला. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यात यावे, अशी सूचना केली. शेतकऱ्यांकडे शिल्लक राहत असलेल्या दुधाची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे दूध खरेदी करण्यात यावे, अशा सूचना आ. भोयर यांनी याप्रसंगी संघाला केल्या.प्रोटिन्सचे कारण केले जातेय पुढेदूध उत्पादक संघाचे बीडीओ नवले यांनी दररोज दूध संघाच्या कार्यालयात ७ हजार लिटर दूध विक्रीसाठी येत असल्याची माहिती दिली. परंतु, जिल्ह्यासह विदर्भातील दुधात प्रोटीन्स व गुणवत्तेची कमतरता असल्याने दूध खरेदी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दुधापैकी रोज ७०० लिटर दूध प्रोटीन्सच्या कारणामुळे नाकारण्यात येत असल्याचे नवले यांनी आमदार भोयर यांना सांगितले. लॉकडाऊन असल्याने संघाकडून सध्यास्थितीत ३७ संस्थांचे दूध खरेदी करण्यात येत असल्याची माहिती दिली. सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचे दूध खरेदी करण्यात यावे, सरसकट दूध नाकारण्यात येवू नये, दूध उत्पादकांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी व संकटाच्या काळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशा सूचना आ. डॉ. भोयर यांनी केल्या.त्वरित मार्ग काढा - सुनील राऊतजिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यातील दुधात प्रोटीन्सची कमतरता असल्याने दूध नाकारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत यातून त्वरीत मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी आमदार भोयर यांच्याकडे केली.

टॅग्स :milkदूध