शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:58 IST

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले.

ठळक मुद्देअधिकारी मोर्चास्थळी पोहोचले : सातही दिवस सकाळी शेतीला वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. व मोर्चातील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, निलेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नयनसुख लढ्ढा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर विविध वक्तयांनी मनोगत व्यक्त केले. आणि मोर्चाचा समारोप झाला. शेतातील ओलिताकरिता आठवड्यातील सात दिवस आठ तास वीजपुरवठा दिवसा करावा, बोंडअळीच्या मदतीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाच्या १४ जून २०१८ च्या जीआर नुसार जाहीर केलेले. १००० रुपये प्रतिक्विंटल बोनस तत्काळ द्यावे, २०१८-१९ या हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करुन शासनाने हमीभावाने खरेदी त्वरित सुरू करावी, कृषीपंप वीजजोडणीकरिता सहा महिन्यांआधी ज्या शेतकऱ्यांनी डिमांडनोटनुसार रकमेचा भरणा वीजवितरणकडे केला. त्या शेतकऱ्यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी. तळेगाव, चिस्तुर, आनंदवाडी, भारसवाडा, टेकोडा, बेलोरा आणि खडका या गावांची कृषीपंप व गावठाण वीज जोडणी एकाच लाईनवर असल्याने ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. या गावांची कृषीपंप व गावठाण लाईन वेगळी करण्यात यावी, आदी मागण्याकरिता शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या आक्रोश मोर्चा दरम्यान शेतकरी महामार्गावर चक्काजाम करू शकतात या भितीमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यामध्ये ज्या ज्या विभागाशी निगडित शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या- त्या विभागाचे सर्व अधिकारी, सिंचन विभाग, महावितरण, सहकार विभाग, वनविभागाशी निगडित असलेले सर्व अधिकारी हे यावेळी निवेदन स्वीकारण्यास मोर्चा स्थळी हजर होते.या आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी यात सहभागी झाले होते. या मोर्चाला निलेश देशमुख, शैलेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी यावेळी मांडल्या.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी