शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा मृत्यूशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे ...

ठळक मुद्देवन्यप्राण्यांकडून नुकसान । विजेच्या धक्क्याने शेतकºयाचा जंगलव्याप्त भागात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जंगली श्वापदांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयोग करतो, मात्र जंगली श्वापदांचा मुक्तसंचार अलीकडे खुप वाढला आहे. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेवून वाढविलेले पीक एका रात्रीतून फस्त केल्या जाते. नाईलाज म्हणून जीवावर उदार होवून अनेक शेतकरी मृत्यूचे सापळे लावतात परंतु क्षुल्लक चुकीने अनेकदा शेतकरीच यात बळी ठरतो. या घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडे इलाज नसला तरी शेतकऱ्यांनी हा जीवावरचा घातक खेळ थांबविण्याची गरज आहे.जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी हा प्रश्न आहे. रानडुकर, रोही, अस्वल व इतर प्राण्यांचा मुक्त संचार असतो. पेरलेल्या पिकांची एका दिवसात माती केल्या जाते. नाईलाजाने शेतकरी शेताच्या सभोवताल बारीक तार लावून त्यात रात्रभर वीजप्रवाह सोडत असतात. अनेकदा चुकीने शेतकऱ्यांचा बळी गेल्याच्या घटना घडतात. शेतकरी वाघ बिबट व इतर जंगली श्वापदांच्या भितीमुळे आता पिकांची जागल करून शकत नाही. आंधार पडण्यापूर्वी शेतातून घरी यावे लागते. मजुर लोक माणसावर हल्ले झाल्याच्या घटनेने कामावर यायला तयार नसतात. अनेकांच्या शेतात रोह्यांची कळप जातात. रानडुक्कर पिकांची नासाडी करते. शेतात महागडे बि-बियाणे पेरल्यावर या प्रकोपामुळे मोठे नुकसान होते. हे माहित असूनही हा जुगार शेतकरी नाईलाजाने दरवर्षी खेळतो यात त्यांचे मोठे नुकसान होते. प्रसंगी स्वत:च्या जीवाशी खेळून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष वाव म्हणून लक्ष द्यावे अशी आमगाव, सोंडी, सालई, सालई (पेवठ) येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.वनविभागाची मदतीसाठी टाळाटाळवन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे शेती हा व्यवसाय करणे तेथील शेतकऱ्यांना कठीण आहे. आता जंगली श्वापदांचे कळप सर्वत्र विखुरले आहे. शेतकरी या प्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. शासन नुकसानग्रस्त शेतकरी व जखमींना नाममात्र भरपाईसाठी वर्षांनुवर्षे झुलवित ठेवते. अनेक शेतकऱ्यांना आशा सोडून दिली. सालईचा गजानन सराडे नावाचा तरूण व्यवसाय सोडून स्वत:ची शेती कसायला लागला. तर त्याच्या हाताला वन्यप्राण्यांमुळे शेतीतून काहीच येत नाही. असे तो सांगत होता, हीच अवस्था सर्वांची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी