शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

ओलितासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा

By admin | Updated: December 28, 2015 02:21 IST

शेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात ..

शेतकऱ्यांना भुर्दंड : सिंचनासाठी असलेल्या योजना ठरताहेत कुचकामीविजय माहुरे सेलूशेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. हा प्रकार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पाटचऱ्या साफ व दुरूस्त केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना शीतलहरीचा सामना करीत पाटचाऱ्या साफ करीत शेतापर्यंत पाणी न्यावे लागत असल्याचे दिसते.सेलू तालुक्याला हरितक्रांतीचे स्वप्न दाखवित ५० वर्षांपूर्वी बोर प्रकल्प निर्माण करण्यता आला. बहुतांश कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी वितरिका, पाटचऱ्या, सायपण तयार करण्यात आले. शेतकरी यामुळे खरीप व रबी, अशा दोन्ही हंगामातील पिके घेऊ लागले. प्रारंभी काही वर्षे वितरिकांची साफसफाई नियमित केली जात होती. पाण्याचे नियोजन केले जात होते. सायपणवर दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी राहत होता. पाण्याचा अपव्यय होऊ नये, याचीही काळजी घेतली जात होती; पण ५० वर्षांपूर्वी असलेल्या वितरिका व पाटचऱ्यांच्या साफसफाई व डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने याची दुरूस्तीच केली जात नाही. बहुतांश ठिकाणी वितरिकेच्या बाजूला असलेल्या शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पिकाचे ओलित करण्यासाठी शेतापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो. पाटचऱ्यांतून पाणी घेण्यासाठी कंबरभर खोल नालीत उतरून प्लास्टिक पिशव्या व दगडांची पाळ लावण्यासाठी आजही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. साफसफाई नसलेल्या वितरिकेत काटे, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याची भीती असली तरी शेतात पेरलेल्या पिकाला पाणी देऊन उत्पन्न घेण्याची आस असलेल्या शेतकऱ्याला शासकीय अनास्थेचा सामना करावा लागत आहे. बोर प्रकल्पाला निधीचा अभाव व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून सिंचन व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगण्यात येत असताना साध्या पाटचऱ्यांची दुरूस्ती होत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली; पण सध्या या व्यवस्थेला अखेरची घरघर लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे. हा त्रास दूर करण्यासाठी शासन लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.