शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गासाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:03 IST

स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शेतमजुर व गोपपालकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदांना सादर करण्यात आले असून वेळीच मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देमागणीवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावरील भुयारी मार्गाच्या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शेतमजुर व गोपपालकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदांना सादर करण्यात आले असून वेळीच मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.१०० फुट रूंदीचा एकपाळा पांदण रस्ता येथील शेतकऱ्यांसाठी तसेच एकुर्ली, अंदोरी व इतर गावांना जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. या पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न सोडता चारपदरी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. याबाबत संबंधितांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली. खा. रामदास तडस तसेच सदर महामार्गाचे काम ज्या अधिकाºयांच्या देखरेखीत होत आहेत ते अधिकारी तसेच इतर अधिकाºयांनी मौका पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात भुयारी मार्गाचा विचार न झाल्याने अद्यापही समस्या कायम आहे. तहसीलदार बोंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करून भुयारी मार्ग आवश्यक असल्याचे नमुद केले. परंतु, गेल्या महिन्याभरात भुयारी मार्गाच्या निर्मितीबाबत कोणतेही पाऊल न उचलता महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर मिठ चोळणाराच ठरत असल्याचा आरोप करीत सदर पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनात अशोक डाखोरे, गणेश गिरडे, महेश जोशी, अब्दुल जब्बार तंवर, मोहन ठाकरे, सुरेश वैद्य, रवी करोटकर, सुरेश कामडी, गणेश सुरकार, गजानन कारोटकर, अजय देशमुख, राजू इंगोले यांच्यासह परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.