शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

शेतकरी कर्जमुक्तीकरिता काँग्रेसची कचेरीवर धडक

By admin | Updated: July 11, 2015 02:45 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत.

वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत. शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला असताना त्याच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक देण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. कृषीकर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, एकाही बँकेत पूर्णत: कर्जाचे गठण झाले नाही. पेरणीच्या वेळी उसणवारी आणत काम निभावण्यात आले. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. तरीही राज्य शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विशेष सहकार्य होत नाही. निवडणुकीच्या काळात कृषी मालाचे दर वाढविण्याचे आश्वासन मोदी शासनाने दिले होते. ते हवेतच विरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोहत्या बंदी कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यात शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांचे काय, याचा विचार कायदा करणाऱ्यांकडून झाला नाही. ही जनावरे शेतकऱ्यांनी कुठे न्यावी, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पोषण शेतकऱ्यांनी कसे करावे याचा विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. साई मंगल कार्यालयातून निघालेल्या मोर्चात आ. रणजित कांबळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रवीण हिवरे, जि.प. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे, मनोज चांदूरकर, मोरेश्वर खोडके, सभापती मनोहर खडसे, उपसभापती गुलाब डखरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहू, शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, रमेश सावरकर, अशद उल्ला खान अहमद खान, विवेक इंगाले, नगरसेवक शरद आडेंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी) तर भाकड जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणूशासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात भाकड जनावरांची समस्या येत्या दिवसात डोके वर काढणार आहे. या जनावरांचे काय करावे या बाबत शासनाने विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ही भाकड जनावरे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणू, असा इशारा यावेळी आ. रणजित कांबळे यांनी दिला. पोलिसांशी तू.. तू.. मै.. मै.. मोर्चा आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याकरिता निघाला असता न्यायालयाच्या द्वाराजवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांना न जुमानता मोर्चेकर पुढे निघाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ पुन्हा पोलिसांशी वाद झाला. यावेळी आ. कांबळे व ठाणेदार बुराडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. वाद चिघळण्याचे संकेत दिसताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मध्यस्ती केल्याने वाद निवळला.