लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : वायगाव (हळद्या) येथील शेतकरी प्रदीप सूर्यभान मून (३५) यांच्या शेतात पावर ग्रीड कंपनीचा टॉवर सन २०१३ मध्ये उभा करण्यात आला. पॉवरग्रीड कंपनीने आपल्या मनमर्जीने शेतकऱ्याला विश्वासात न घेता टॉवरचे बांधकाम केले. याचा मोबदला मिळण्याकरिता प्रदीप मून यांनी आंदोलन केले होते. पण त्याचा लाभ झाला नसल्याने त्यांनी पुन्हा महाराष्ट्र दिनी याच टॉवरवर चढून आंदोलन केले.प्रदीप सूर्यभान मून यांनी ४ जून २०१४ रोजी मोबदला मिळण्याकरिता मालकी शेतातल्या टॉवरवर चढून आंदोलन केले होते. त्यावेळी पोलीस प्रशासन, तहसीलदार व पॉवरग्रीड कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत त्वरीत मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी आठ दिवसानंतनर शेतीत झालेल्या पिकाच्या नुकसानीचा मोबदला १ लाख ५० हजार रुपये दिले; परंतु टॉवरचे बांधकाम केलेल्या जागेचा अद्याप मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी महाराष्ट्रदिनी सकाळपासून टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी प्रकाश महादेव शेंडे, आशिष विठ्ठल घुमडे या टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.विद्युत टॉवर खाली व विद्युत तारेखाली मिळणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसून विद्युत टॉवरखाली जी जमीन येते तेथील क्षेत्र ८ गुंठे धरून रेडी रेकनारचा जो दर आहे त्याच्या चारपट मोबदला मिळण्यात यावा. रस्त्यात जमीन गेल्यास एमआयडीसी व धरणासाठी जमीन लागत असल्यास चारपट मोबदला दिला जातो. पण टॉवर ग्रस्तांना दोन पटच मोबदला मिळतो. याकरिता आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता विरूगिरी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी ठाणेदार प्रवीण मुंडे व त्याचे सहकारी स्वप्नील वाटकर, अजय घुसे, बुरंगे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळावर हजर होते.आंदोलकाच्या मागण्या कधीही रास्त असल्या तरी चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले. विद्युत प्रवाहाचा टॉवर सुरू असून आंदोलन करणे व सूचना देऊनही न जुमानता आंदोलन केल्यामुळे त्यांना १६८ नुसार अटक करून सुटका करण्यात आली.- प्रवीण मुंडे, ठाणेदार, समुद्रपूर२०१३ पासून विविध प्रकारे प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना पूर्णत: मोबदला न मिळाल्याने मला जीव घेणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यास भाग पडले.- प्रदीप मून, टॉवरग्रस्त शेतकरी.
टॉवरच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची विरूगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:43 IST
वायगाव (हळद्या) येथील शेतकरी प्रदीप सूर्यभान मून (३५) यांच्या शेतात पावर ग्रीड कंपनीचा टॉवर सन २०१३ मध्ये उभा करण्यात आला. पॉवरग्रीड कंपनीने आपल्या मनमर्जीने शेतकऱ्याला विश्वासात न घेता टॉवरचे बांधकाम केले.
टॉवरच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची विरूगिरी
ठळक मुद्देपोलिसांकडून बळजबरी करून मोडण्यात आले आंदोलन