शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 28, 2015 23:38 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने

हिंगणघाट : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने कापसाची खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने सोमवारपर्यंत (दि़२६) कापूस खरेदी होणार नसल्याचे पत्र सीसीआयने बाजार समितीला दिले. यानंतर पुन्हा पत्र देऊन २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे सांगितले; पण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही़ यामुळे मंगळवारी (दि़२७) सकाळी ८ वाजतापासून कापसाच्या सुमारे ११०० ते १२०० गाड्या, ट्रक, ट्रक्टरची लांब रांग लागली़ यावेळी २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी बंद असल्याचे सीसीआयने सांगताच शेतकरी संतप्त झाले. सीसीआय खरेरी करीत नसल्याने शेतकऱ्यांना ३६००-३७०० रुपये दराने खासगी व्यापाऱ्यास कापूस विकावा लागणार होता़ आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान अटळ होते़ ७०० ते ८०० संतप्त शेतकऱ्यांनी आ़ समीर कुणावार यांचे घर गाठले़ सीसीआयला कापूस खरेदी करण्याचा आग्रह करण्याची मागणी केली़ कुणावार यांनी दखल घेत आकोट येथे सीसीआयचे अधिकारी मौर्या यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला; पण मौर्या यांनी कापूस ठेवण्यासाठी जागाच नसल्याने खरेदीस असमर्थता दर्शविली़ यावर त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून कपाशीची खरेदी सुरू करण्याचा आग्रह धरला. यानंतर सीसीआयचे विदर्भ प्रमुख सिंग यांच्याशी संपर्क साधला़ ना. मुनगंटीवार, आ. कुणावार व सिंग यांनी कॉल कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर सिंग यांनी कापूस खरेदीचे आदेश दिले़ या वाटाघाटीनंतर दुपारी १२ वाजतापासून कापूस खरेदीस प्रारंभ झाल्याने तणाव निवळला़ मंगळवारी तब्बल ३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांना माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. अन्यथा लाखो रुपयाचा तोटा सहन करावा लागला असता.(तालुका प्रतिनिधी)