शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांना सुविधाच नाही

By admin | Updated: July 14, 2016 02:06 IST

शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून शासनाने भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारांना नियमनातून मुक्त केले.

व्यापाऱ्यांची लिलावातून माघार : भाजीपाला, फळे बाजार समितीच्या नियमनातून मुक्त प्रशांत हेलोंडे वर्धा शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून शासनाने भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारांना नियमनातून मुक्त केले. यानंतर शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना विकता येणार आहे. यामुळे अडत्यांना द्यावा लागणारा पैसा वाचणार असून व्यापाऱ्यांकडूनही लूट थांबणार आहे; पण शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांची थेट विक्री झेपणार काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्या खरीप हंगामाची कामे असल्याने शेती करायची की, भाजीपाला, फळे विकायची, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. शासनाने व्यापारी, दलाल यांची दंडुकेशाही मोडीत काढण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केले. आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. यासाठी बाजार समितीच्या आठवडी बाजारांमध्ये शेतकऱ्यांना जागाही उपलब्ध होऊ शकते. या निर्णयातून शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे विकताना कुणालाही कमीशन द्यावे लागणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांना भाजीपाला, फळे विकावी लागणार नाही. थेट ग्राहकांपर्यंत हा शेतमाल शेतकरी पोहोचवू शकतील. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असून मोठ्या शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे. असे असले तरी सरसकट सर्वच शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे बाजारात स्वत: विकता येईल काय, हा प्रश्नच आहे. सध्या शेतातील खरीप हंगामातील कामे सुरू आहेत. पिके वर आली असून खते देणे, फवारणीची कामे सुरू आहेत. शिवाय शेतकऱ्यांना शेतात मजुरांवरही देखरेख ठेवावी लागते. या सर्व कामाच्या व्यापातून शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्री करणे परवडणारे आहे काय, शेतमाल विक्रीतून नफा कमविता येईल काय, दिवसभर भाजी विकली तर शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही काय, दैनंदिन भाजी, फळ विक्री शेतकऱ्यांना शक्य आहे काय आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांनी संप पुकारला. वर्धेतही एक दिवस संप झाला. गुरूवारपासून वर्धेतील भाजी, फळ खरेदीदार व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. तत्सम पत्रही बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले आहे. यामुळे गुरूवारी ग्राहकांना फळे, भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करावा लागणार आहे. शिवाय व्यापारी लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याने शेतकऱ्यांनाही अडचणीचेच होणार आहे. बाजारात लिलावासाठी आणलेला भाजीपाला, फळे शेतकऱ्यांना दिवसभर विकावा लागणार आहे. या प्रकारामुळे जुनी व्यवस्था कोलमडणार असून बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीही शासनाच्या या निर्णयामुळे आम्ही अडचणीत येऊ, अशाच प्रतिक्रीया व्यक्त करताना दिसले. वर्धेच्या बाजारात जिल्ह्याच्या सीमेवरूनही येतो भाजीपाला व फळे वर्धा येथील भाजी बाजारामध्ये जिल्ह्याच्या सिमेलगतच्या गावांतूनही शेतकरी भाजीपाला, फळे विक्रीस आणतात. यात कानगाव, काचनूर, तरोडा, हिंगणघाट जवळील गावे, चितोडा, अमरावतील जिल्ह्यालगत असलेल्या गावांतूनही वर्धेत भाजीपाला आणला जातो. आता व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने या शेकडो शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे स्वत: विकावा लागणार आहे. लिलावावरही प्रश्नचिन्ह वर्धेच्या भाजी बाजारात सुमारे १३२ व्यापारी व ६० ते ७० अडते शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळे या मालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत होते. यातील चुकारा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अंशत: रोखीने दिला जात होता. यातूनच शेतकऱ्यांना अडत्यांना ६ टक्के कमिशन द्यावे लागत होते. आता गुरूवारपासून व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने दूरवरून येणाऱ्या शेतमालाचे काय होणार, हा प्रश्नच आहे. अडते लिलाव करण्यास तयार आहे; पण व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली आहे. शेतमाल विक्रीची जुनीच पद्धत योग्य आजपर्यंत शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल भाजी मंडईमध्ये दलालांमार्फत व्यापारी खरेदी करीत होते. या पद्धतीने शेतकऱ्याने आणलेल्या भाजीपाला, फळांची विक्री करताना अडते मध्यस्थाची भूमिका निभवित होते. व्यापारी लिलावामध्ये सहभागी होऊन भाजीपाला, फळे खरेदी करीत होते. यानंतर तो बाजारामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत विकला जात होता. यात शेतकऱ्यांना फार वेळ खर्ची घालावा लागत नव्हता. केवळ मध्यस्थी म्हणून अडत्यांना ६ टक्के दलाली द्यावी लागत होती.