शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रे पूर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपीककर्ज मिळण्यात अडचण : लॉकडाऊनमुळे तलाठीही अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येत्या दहा दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आहे. परंतु, आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.पाच मे रोजी तहसीलदारांनी ऑनलाईन सातबारा, आठ अ उताऱ्यावर पीककर्ज देण्याचा आदेश काढला. त्यावर केवळ रेग्यूलर कर्जदारांनाच पिककर्ज मिळू शकते. जे थकीत होते, शासनाच्या कर्जमाफीमुळे पीक कर्जास पात्र ठरले तसेच जे नव्याने कर्ज घेणारे आहे. त्यांना सातबारा, आठ अ व्यतिरिक्त नकाशा, चतु:सिमा, फेरफार पंजी, हैसियत प्रमाणपत्र, स्टॅम्प शपथपत्र आदी कागदपत्रांची पुर्तता केल्याशिवाय कर्ज मिळणार नसल्याचे सांगितले.पवनार येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया शाखेत सोळाशेवर खातेदार आहे. तर नियमित कर्जदार केवळ दोनशेच्या घरात आहे. जर आवश्यक कागदपत्र मिळाली नाही तर त्यांना कर्जपुरवठा होणार नाही.लॉकडाऊनमुळे शेतमाल घरीज आहे. हमी भावात विकलेल्या तुरीचे, कापसाचे अजून चुकारे मिळाले नाही. भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.पीक कर्ज मिळत नसून खरिपाच्या पेरणीकरिता बि-बियाणे, खतांचे व्यवस्थापन कसे करावे, याच विवंचनेत शेतकरी आहे. तलाठ्यांना कोविड- १९ च्या बंदोबस्तातून मोकळे करून आपआपल्या साझ्यात पाठविणे गरजेचे आहे. तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कागदपत्रांचा मार्ग सुकर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.प्रकरणे मंजूर करण्यासंदर्भात व्यवस्थापकांना विनंती केली. कोविड-१९ मधून बाहेर निघाल्यानंतर राहिलेले कागदपत्र घ्यावे असा आग्रह केला. पण, व्यवस्थापकांनी याचा अधिकार मला नसल्याचे सांगितले. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देणार आहे.- शालिनी आदमने, सरपंच ग्रा.पं. पवनार.नियमित कर्जदारांना ऑनलाईन सातबारा, आठ-अ वर कर्जपुरवठा सुरू आहे. पण, थकीत व नवीन शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय कर्ज प्रकरण मंजूर करता येणार नाही.- लोणकर, व्यवस्थापक, सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया.तहसीलदारांच्या आदेशान्वये सातबारा, आठ अ (ऑनलाईन) उताऱ्यावर कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासंदर्भात बॅँक व्यवस्थापकाशी चर्चा केली. परंतु, बॅँकेचे सर्क्युलरनुसार कागदपत्रं आवश्यक असून त्याशिवाय कर्ज प्रकरणे मंजूर होणार नाही.- संजय भोयर, तलाठी, पवनार.

टॅग्स :Farmerशेतकरी