शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा शेतमाल राहतो उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे.

ठळक मुद्देलिलाव शेड ‘फुल्ल’ : नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची?

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सोयाबीनची मळणी सुरू असल्याने बहुतांश शेतकरी शेतातूनच सोयाबीनची पोती थेट बाजार समितीत नेत आहेत. सेलूच्या बाजार समितीत आवक वाढली असून सध्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अचानक पाऊस पडल्यास त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. अशावेळी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कुणाची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून विचारला जात असून बाजार समिती प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. शिवाय तशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मंगळवारी बाजारपेठ बंद असतानाही शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळच्या लिलावात आपला शेतमाल विकला जावा या आशेने मोठ्या प्रमाणात शेतमाल आणला. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांवर दिवाळी हा सण असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या बाजारपेठेत शेतमालाची आवक वाढली आहे. असे असले तरी मोठ्या विस्तीर्ण जागेत असलेले लिलाव शेड हाऊस फुल्ल असल्याने सध्या शेतकऱ्यांनाच त्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागत आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे. विशेष म्हणजे लिलाव शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड