शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:38 IST

शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो.

ठळक मुद्देसुधीर कोठारी : कृउबासतील शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यास भावही योग्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सन १९९२ पासून बाजार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक उत्तम भोयर, ओमप्रकाश डालीया, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, अशोक उपासे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शेतकरी रितेश तळवेकर रा. सिंदी (रेल्वे) यांचा सत्कार करण्यात आला.कृउबासचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे, पण माल विकायचा नाही तसेच माल साठवणुकीसाठी घरी जागेचा अभाव आहे, अशा शेतकºयांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करावा. साठवणुकीच्या दिवशी सदर मालाचे बाजारातील दर लक्षात घेता वखार पावतीवर ७० टक्केपर्यंत बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी सहा महिन्याचे आत समितीला जमा केल्यास वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत संबंधित शेतकºयाला परत करण्यात येते. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. तर बाजार समिती हिंगणघाट येथील गोदामात केवळ सोयाबीन या शेतमालाची साठवणूक करण्यात येत आहे. त्यावर ७० टक्के तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात शेतकºयाला गोदाम भाडे, हमालीचा खर्च लागत नाही. तो बाजार समिती करते. शिवाय शेतमालाची विक्रीही बाजार समितीमार्फत केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अशोक उपासे, विनोद वानखेडे, सुरेश सातोकर, बळीराम नासर, संजय तपासे, राजेश मंगेकर, सुरेश वैद्य, बापुराव महाजन, शेषकुमार येरलेकर, पंकज कोचर, राजेश कोचर, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे, संजय कातरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी शेतकºयांना सदर योजनेची सोप्या शब्दात माहिती दिली.