शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतून शेतकरी आंदोलनाची मुहुर्तमेढ रोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:31 IST

शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टी : विदर्भ कार्यकारीणीच्या बैठकीत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वर्धेच्या शेतकरी आंदोलनाला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ अशी ग्वाही स्वाभीमान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिली. विदर्भातील कार्यकारणीच्या बैठकीसाठी ते वर्धेत आले होते. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे, रवि पडोळे, भास्कर इथापे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, दूध आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता आॅक्टोंबरमध्ये शेतकऱ्यांसाठी भावाबाबत आंदोलन वर्धेवरून छेडण्यात येणार आहे. वर्धा शहरात हा पक्षाचा पहिलाच कार्यक्रम आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने पहिल्या अर्थसंकल्पात नद्या जोड प्रकल्पासाठी १ हजार कोटी रूपयाची अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्यानंतर पुढे या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात पडले. शाश्वत सिंचनाची जोड शेतीला दिल्या गेली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. या सर्वसमावेशक कार्यक्रमाला राबविण्याची हमी देणाºया पक्षाला भविष्यात पाठींबा देवू अशी माहितीही त्यांनी दिली. या बैठकीत स्वाभिमान शेतकरी संघटनेची वर्धा लोकसभा क्षेत्र कार्यकारणी घोषीत करण्यात आली. यात वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून भास्कर इथापे, जिल्हाध्यक्षपदी पवन तिजारे, जिल्हा सचिव एकनाथ डहाके, वर्धा विधानसभा अध्यक्ष जतिन रननवरे, वर्धा शहर अध्यक्षपदी सुयोग नवघरे, सेलू तालुका अध्यक्ष संजय धोंगडे, युवा अध्यक्ष वर्धा जिल्हापदी बबलु चौधरी, युवा अध्यक्ष वर्धा विधानसभापदी अमित कावळे, आर्वी विधानसभा प्रमुखपदी डॉ. गौरव वाघ, कारंजा तालुका अध्यक्ष रूपेश मस्के देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्षपदी मदन दांडेकर, देवळी शहर अध्यक्ष म्हणून राहुल भारती, पुलगाव शहर अध्यक्ष रितेश धांदे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी दशरथ ठाकरे, प्रदीप कांबळे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोद कानफाडे, यांची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती खा. शेट्टी यांनी दिली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी