शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याकरिता शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:31 IST

महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे.

ठळक मुद्देमंगळवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे. यात शेतकºयांचा जीव गेल्यास त्याची जबाबदार महावितरण घेईल काय, असे म्हणत शेतकरी संघटनांच्यावतीने मंगळवारी (५ डिसेंबर) बोरगाव मेघे येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.खरीप हंगामात अतिपावसान सोयाबीन व गुलाबी बोंड अळीने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात शेतकºयांनी गहु, चना, भाजीपाला आदी पिकांची शेतात लागवड केली. रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी ओलीत करू शकत नाही. जर रात्री ओलीत करताना शेतकºयांच्या किंवा शेतीत काम करणाºया मजुराच्या जीवितास हानी झाल्यास याची जबाबदारी वीज मंडळ घेणार काय? हा जाब विचारण्यासाठी व शेतकºयांची अडचण लक्षात घेवून शेतकºयांना कृषी पंपासाठी दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करावा. या मागणीसाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता, कार्यालय बोरगाव(मेघे) येथे शेतकरी धडकणार आहे. या आंदोलनात सहभाग नोंदविणाºया शेतकºयांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे एकत्र यावे असे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य मधुसुदन हरणे, जिल्हा प्रमुख उल्हास कोटंबकर, युवा आघाडी अध्यक्ष अरविंद राऊत, उपाध्यक्ष गणेश मुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांनी केले आहे.