शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१,१३७ हेक्टरवरील शेतपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:12 IST

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस अन् गारपीट : घरांसह गोठ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शुक्रवार २५ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे एकूण १ हजार १३७ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.यंदाच्यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरणीच्या कामाला शेतकºयांनी गती दिली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने तूर, कपाशी आदी पीकही बºयापैकी बहरले. सध्यास्थितीत कोरडवाहू शेतजमीनीवरील कपाशीची उलंगवाडी झाली असली तरी ओलिताच्या शेतात अद्यापही कपाशीचे पीक कायम आहे.शुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या झाडाची फुटलेली बोंड भिजल्या गेल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर काही भागात गारपीट झाल्याने याचा चांगलाच फटका गहू व हरभरा या रबी पिकांनाही बसला आहे. तर संत्रा या पिकाचे गारपीटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. वादळीवाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतात उभे असलेल्या हरभरा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. त्यात एकूण १ हजार १३७ हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे नमुद आहे. तर महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सेलू तालुक्यातील तीन गोठ्यांचे आणि एका घराचे अंशत: नुकसान झाल्याचे आणि आर्वी तालुक्यातील एका घराचे पूर्णत: नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.शेतपिकांचे वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसानशुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीटामुळे वर्धा तालुक्यातील शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. वर्धा तालुक्यातील १६३ हेक्टर, सेलू तालुक्यातील ३७१ हेक्टर, देवळी तालुक्यातील २८५ हेक्टर तर आर्वी तालुक्यातील २१८.३० हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे ३३ टक्केच्या आत आणि वर्धा तालुक्यातील ६५ हेक्टर व सेलू तालुक्यातील ३५ हेक्टर वरील शेतपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अभिप्राय जिल्हा प्रशासनाला कृषी विभागाने सादर केला आहे.

टॅग्स :agricultureशेती