शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात रुग्णवाहिकेअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:55 IST

सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास नागपूर येथे हलविण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा पुरविण्यास नकार दिल्याने देवानंद कनेरी या शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारने केला आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचा आरोप नागपूरला हलविण्यासाठी सेवा दिली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास नागपूर येथे हलविण्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा पुरविण्यास नकार दिल्याने देवानंद कनेरी या शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारने केला आहे.रसुलाबाद येथील शेतकरी देवानंद रामभाऊ कनेरी (५०) हे शनिवारी सकाळी शेतात काम करीत असताना भोवळ येवून पडले. त्यांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना प्रहार संस्थेच्या रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली व त्यांच्या डोक्याची रक्तवाहिनी फाटल्याने त्यांना नागपूर येथे हलवावे लागेल असे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते राजेश सावरकर यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त सरकारी रुग्णालयातच सुविधा पुरवितो, खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी सुविधा देता येणार नाही, असे सांगून १०८ रुग्णवाहिका सेवा देण्यास नकार दिला. दोन तास हा सर्व घटनाक्रम चालला.त्यानंतर सावंगी रुग्णालयाचे प्रमुख उदय मेघे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व रात्री ११ वाजताच्या सुमारास रुग्णाला नागपूर येथे हलवावे लागले. परंतु या सर्व कालावधीत रुग्णाची प्रकृती खालावली व रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया राजेश सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

१०८ केवळ शासकीय रुग्णालयाकरिता अपघातात रुग्णाला आकस्मिक सेवा देण्याकरिता १०८ ही रुग्णवाहिका शासनाच्यावतीने कार्यान्वीत करण्यात आली आहे. याची जबाबदारी एक विशिष्ट विभाग सांभाळत आहेत. केवळ आकस्मिक सेवेकरिता ही रूग्णवाहिका असून नागरिकांकडून तिचा वापर छोट्या छोट्या कामांकरिता करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य