शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

By admin | Published: April 18, 2017 1:20 AM

खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता.

खत करण्याकडे कानाडोळा : शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल गरजेचावर्धा : खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. यासाठी प्रसंगी मजूर लावून शेतातील काडीकचरा गोळा केला जात होता. त्याचे ढिग लावून ते एकाच वेळी बैलबंडीतून घरी नेले जात होते वा शेतातील गोठ्यांत ठेवले जात होते; पण हल्ली हा काडीकचरा शेतातच जाळण्याचे फॅड आले आहे. शिवाय धुरेही पेटविले जात आहेत. परिणामी, पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या वृक्षांची मोठी हानी होत आहे. याकडे लक्ष देत गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे. शनिवारी व रविवारी शेतकऱ्यांनी धुरे पेटविल्याने शेतातील गोठ्यांची राखरांगोळी झाली. यात अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीसाहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने पूढील हंगामासाठी नव्याने साहित्याची जुळवाजुळव करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे प्रकार नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी गोठ्यांना आग लागले, झाडे जळण्याच्या घटना घडत आहेत. शेजारचे शेतकरी असे प्रकार घडल्यास तक्रारी करीत असून मग, दोषी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे रविवारच्या प्रकरणावरून दिसून येते. यामुळे आपसातील वाद वाढीस लागत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. शेतातून निघणाऱ्या काडीकचऱ्यापासून खत निर्मिती करणे, त्याचा सरपण म्हणून वापर करणे, कोळसा निर्माण करणे आदी प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)गॅस सिलिंडरमुळे इंधन म्हणून वापरही कमीसेवाग्राम : इंधन म्हणून पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या आणि तुरीच्या खुुंटल्यांचा उपयोग केला जात होता; पण नव्या व्यवस्था व सुविधांमुळे ते शेतातच जाळण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. याचा परिणाम लगतच्या झाडांवर होऊ लागला असून लाखमोलाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत.भारतात कृषी व्यवस्था प्रमुख साधन व माध्यम झाले. काळाच्या ओघात परिवर्तन व कृषी संशोधन होऊन क्रांती घडू लागली. याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शेतातील साधन साहित्य जीवनाचा आधार आणि दैनिक गरजा भागविणारा होता. यात इंधन एक साधन होते. शेतातील बाभूळ पऱ्हाट्या, तुराट्या व तुराट्यांचे खुंटले याचा सरपण म्हणून सर्वाधिक उपयोग केला जात होता. घरी, गावात शेतात ठेवण्यासाठी जागा होत्या. उलंगवाडी होताच इंधनाची व्यवस्था शेतकरी व शेतमजूर लावत होते. याच इंधनावर घरातील पाणी गरम करणे ते स्वयंपाक होत होते. आता गॅस सिलिंडरने इंधनाची जागा घेतली आहे. यामुळे तुराट्या, पऱ्हाट्यांच्या मागणीत घट झाली आहे. उपडायला व न्यायला कुणीच तयार होत नसल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने ढिगारे करून ते शेतातच पेटवित आहे. यातून साधन साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकरी शेतमजुरांचा सिलिंडरमुळे खर्च मात्र वाढला.(वार्ताहर)खरडे व प्लायवूड निर्मितीसाठी उपयोग मध्यंतरी शेतातील तुराट्या, पऱ्हाट्या व तुरीच्या खुंटल्यांचा वापर खरडे व प्लायवूड निर्मितीकरिता करण्याचा प्रयत्न झाला. यात ऊसाच्या पाल्याचाही समावेश होता. या प्रयोगाचे नेमके काय झाले, हे पूढे आले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरून शेतकऱ्यांपयृंत पोहोचला असता तर तुराट्या, पऱ्हाट्यांची किंमतही वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता यावर कुठलेही संशोधन होत नसल्याने हा काडीकचरा जाळला जात आहे. शिवाय यातून होणारे प्रदूषण टाळता आले असते. सध्या पऱ्हाट्या, तुराट्या व खुंटल्यांचा उपयोगच होत नसल्याने नाईलाजास्तव ते पेटवावे लागते आहे. परिणामी, दररोजच शेतात, धुऱ्यांवर काडीकचरा पेटविला जात असल्याने परिसर धगधगताना दिसतो.