मारेकरी दोन : बंगळुरू येथून आठ जणांना घेतले ताब्यात वर्धा : जून महिन्यात उजेडात आलेल्या कुटकी येथील दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडविण्यात सेवाग्राम पोलिसांना यश आले आहे. सदर हत्याकांड मारेकऱ्याच्या पत्नीला अर्वाच्च भाषेत बोलल्याने घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हत्या करणाऱ्या दोघांसह एकूण आठ जणांना पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. त्यांची विचारपूस सुरू असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.हत्याकांडातील आरोपी हाती आले तरी मृतकांची ओळख पटने शक्य झाले नाही. असे असले तरी या हत्या प्रकरणात आढळलेले दोनही मृतदेह पुरूषांचाचेच असल्याचा उलगडा मात्र येथे झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत यातील एक पुरूष व एक स्त्री असल्याची चर्चा जोरात होती. ताब्यात घेण्यात आलेल्या आठ पैकी दोघांनी हे हत्याकांड घडवून आल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे. या दोन मुख्य आरोपीसह अन्य सहा जणांनाही चौकशीकरिता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून प्रकरणाचे सत्य उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहे. मुख्य मारेकऱ्यासह फरार असलेले इतर नागरिक या प्रकरणाचे साक्षिदार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांना अद्याप अटक करण्याची कारवाई सुरूच होती. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवसापासून हे दोघे पारधी बेड्यावरून फरार झाल्याचे दिसून आले होते. हत्या प्रकरण उघड होताच तपास सुरू असतानाच अंबानगर येथील बेड्यावरील इतरही फरार झाले. यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय पक्का झाला होता. त्यांचा शोध सुरू असताना ते बंगळुरू येथे असल्याचे कळले. यावरून सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. सुत्रांच्या माहितीनुसार, मारेकरी व मृतक यांच्यात मे महिन्यात पत्नीच्या कारणावरून वाद झाला. या वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती हाती आली आहे. शिवाय हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी मृतकांना यथेच्च दारू पाजल्याचेही समोर येत आहे. दारूच्या नशेत असलेल्या दोघांवरही लाकडी काठीने वार करून संपविण्यात आले. त्याचा पुरावा नष्ट करण्याकरिता या दोघांचे मृतदेह पोत्यात बांधून बेड्यानजीक असलेल्या शेतात नेत पुरल्याचे ताब्यातील संशयीत सांगत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या आरोपींच्या मागावर राहून त्यांना सेवाग्राम ठाण्यात आणण्याची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रेखा साळवे, जमादार रामदास बिसणे, अमोल भिवापुरे, चालक अजय वाखेडे व महिला पोलीस पंचशिला कांबळे यांनी पार पाडली.(प्रतिनिधी) दोन्ही मृतदेह पुरूषांचेच जून महिन्यात उघड झालेल्या या हत्याकांडात दोन मृतदेह आढळून आले होते. यातील एक मृतदेह पुरूषाचा व दुसरा स्त्रीचा असल्याचे बोलले जात होते. मात्र मारेकरी ताब्यात येताच ते दोन्ही मृतक पुरूषच असल्याचे समोर आल्याने स्त्री - पुरूष वादावर पडदा पडला आहे. दारूच्या नशेत संपविले मे महिन्यात घडलेल्या या हत्या प्रकरणात पत्नीला अर्वाच भाषेत बोलण्याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. याच कारणावरून रात्री दोनही मारेकऱ्यांनी मृतकाला दारू पाजून त्यांच्यावर वार केल्याचे समोर येत आहे. मृतकांचीही ओळख पटणे शक्यपारधी बेड्यावरील सर्वच रहिवासी बेपत्ता झाल्याने मृतकांचीही ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते. संशयीतांना ताब्यात घेताच त्यांचीही ओळख पटने शक्य झाले आहे.भाषा आली कामीया प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना भाषेची अडचण जात होती. यामुळे सेवाग्राम ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला येत असलेली भाषा येथे कामी आली.
पत्नीबद्दल अर्वाच्च बोलल्यामुळे घडले कुटकीचे दुहेरी हत्याकांड ?
By admin | Updated: August 23, 2015 02:13 IST