शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गौरक्षण वाॅर्डात सुरू होते बनावट कॉल सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 05:00 IST

तुषार दिलीप कोल्हे (रा. नागपूर) याने रुचिका दादाराव खोब्रागडे (रा. आमगाव (जं.), ता. सेलू) हिच्यासोबत संगनमताने रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायसी घेऊन सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुला-मुलींचे फोटो व वैयक्तिक माहितीची चोरी करून त्यांची बनावट प्रोफाईल तयार करत होते. यासाठी बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. तसेच ज्या ग्राहकाची पसंती आली, त्यांना खोटी माहिती पुरवून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्याकडून पैसे उकळत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराचे हृदयस्थान असलेल्या रामनगर भागातील गौरक्षण वॉर्ड परिसरात नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी चक्क बोगस कॉल सेंटर सुरू होते. हा धक्कादायक प्रकार सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत पुढे आला आहे. या कारवाईदरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी बनावट कॉल सेंटरमधून १ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.‘रिश्ते गाईड डॉट कॉम साईट’वर बनावट प्रोफाईल बनवून त्यात चुकीची माहिती भरुन ती प्रोफाईल संकेतस्थळावर अपलोड करीत फिर्यादीची बदनामी केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तांत्रिकदृष्ट्या अधिकची माहिती गोळा करून रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरक्षण वॉर्ड भागातील अग्रवाल यांचे घरी भाड्याने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला. या ठिकाणच्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, तुषार दिलीप कोल्हे (रा. नागपूर) याने रुचिका दादाराव खोब्रागडे (रा. आमगाव (जं.), ता. सेलू) हिच्यासोबत संगनमताने रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायसी घेऊन सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुला-मुलींचे फोटो व वैयक्तिक माहितीची चोरी करून त्यांची बनावट प्रोफाईल तयार करत होते. यासाठी बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. तसेच ज्या ग्राहकाची पसंती आली, त्यांना खोटी माहिती पुरवून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्याकडून पैसे उकळत होते. संबंधित काॅल सेंटरचे भरपूर ग्राहक असून, मोबाईल फोनद्वारे माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सहा महिला कामावर ठेवून लग्न जुळवून देतो, असे भासवून लोकांची आर्थिक फसवणूक तसेच बनावट प्रोफाईल तयार करून बदनामी केली असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनीही बनावट कॉल सेंटरमधून सात साधे, तर चार ॲन्ड्राॅईड मोबाईल, ३८ हजार ४९० रुपये रोख, चार संगणक संच, मोबाईल चार्जर, २१ रजिस्टर आदी एकूण १ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, अमोल लगड, बालाजी लालपालवाले, गजानन लामसे, नीलेश कट्टोजवार, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, रितेश शर्मा, राजू जयसिंगपुरे, अंकित जिभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन यांनी  केली.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया