शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:30 IST

शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.

ठळक मुद्देयंत्रामुळे होते भुकटी : ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.विदर्भात नगदी पीक कापूस तर उदरनिर्वाहासाठी ज्वारी, बाजरी, गहू आणि अन्य कडधान्य शेतकरी शेतात पिकवीत होते. कापसाच्या व्यवहारातून घर बांधणे, लग्नप्रसंग आदी कार्यासाठी तरतुदी शेतकरी करीत होते. धान्यातून शेतीव्यवहार आणि खाद्य म्हणून उपयोग प्रत्येक शेतकरी करीत असत.प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आणि गायी राहत असत. त्यांच्यासाठी वैरण म्हणून कडबा, कुटार व गव्हाचा गवंडा अशी व्यवस्था असल्याने शेतकरी आनंदाने जीवन जगत होता. शेतीव्यवस्थेतून मानवी जीवनशैली आत्मसात केल्यानेच शेतकरी खऱ्या सुखात नांदत होता.शासनाने सोयाबीन आणले, बाजाराधीन व्यवस्था निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा व्हायला लागला.ज्वारीसोबत जनावरे गेली. यांत्रिक शेती जीवावर बेतणारी ठरू लागली. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांचा कल नवनवीन तंत्रज्ञानाकडे असल्याचेच दिसून येत आहे. सोयाबीन पिकामुळे ज्याप्रमाणे ज्वारीचे पीक मागे पडले, तर यंत्राच्या साहाय्याने पिकांची काढणी केली जात असल्याने गुरांचा चारा मिळेनासा झाला आहे. यंत्राच्या साहाय्याने काढणी करीत असताना केवळ बारीक भुकटी शिल्लक राहते. ते गुरे खाऊ शकत नसल्याने दुसऱ्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.यावरच पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सध्या कड्याळू आणि चाऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे. बहुतांश शेतामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारीचे पीक दिसून येत आहे. हा हिरवा चारा गुरांकरिता उपयुक्त असला तरी तो चारण्याचेही तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती