शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 15:49 IST

वर्धा नगरपालिकेतील आरोग्य विभागात मुख्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याची घटना येथे घडली.

ठळक मुद्देसायबर सेलकडे तक्रारहॅकरने अनेकांना केली पैशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नगरपालिकेतील आरोग्य विभागात मुख्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याची घटना येथे घडली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ठाकूर यांच्या फ्रेन्ड लिस्ट मध्ये असलेल्या व्यक्तींशी चॅटिंग करून अतिशय महत्त्वाचे काम असल्याचे सांगून अनेकांना पैशाची मागणी केली. हॅकरच्या या खोट्या बतावणीला ठाकूर यांच्या फ्रेड लिस्टमध्ये असलेला चैतन्य गावंडे बळी पडला. त्याची तब्बल १५ हजाराने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्ट मधील अनेकांशी आरोपीने चॅटिंग केली. या चॅटिंग दरम्यान हॅकरने हिंदी भाषेत संवाद साधून अतिशय महत्त्वाच्या कामासाठी पैशाची नितांत गरज असल्याचे सांगितले. शिवाय सदर संवादादरम्यान हॅकरने एक बँक खाते क्रमांक देत आॅनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सुचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला मूळचा वर्ध्यातील रहिवासी असलेला आणि सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम आॅनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून अनेकांचे फोन आल्यानंतर आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच अशोक ठाकूर यांनी सुरूवातीला शहर पोलीस स्टेशन तर नंतर वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर सेल मधील तज्ज्ञांनी हॅक झालेल्या फ्रेसबुक अकाऊंटचा युजर व पासवर्ड क्रमांक बदलून दिला. शिवाय सदर प्रकार नेमका काय याची चौकशी सुरू केली आहे.हॅकरने केला संवादअशोक ठाकूर यांच्या फेसबुक वरील फ्रेड लिस्टमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष नीरज गुजर, कंत्राटदार बाबा जाकीर, भाजप शहर प्रमुखाचे पुत्र अंकीत परियाल, किराणा व्यावसायिक मिलिंद गांधी, माजी नगरसेविकेचे पुत्र अमित जैन, शिवाय एक पत्रकार या वर्धा शहरातील दिग्गजांसह ठाकूर यांच्या निकटवतीर्यांशी संवाद साधून पैशाची मागणी केली.वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्टमधील व्यक्तींना पैशाची मागणी केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या फेसबुकचा युजर व पासवर्ड बदलून देण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, वर्धा. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम