शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

विस्तारीकरण करा, पण पर्यावरण जपा

By admin | Updated: June 25, 2015 02:14 IST

पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यास भुगाव येथील मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाला कुठलाही विरोध असणार नाही, ....

उपस्थितांचा सूर : उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाबाबत पर्यावरण जनसुनावणीवर्धा : पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यास भुगाव येथील मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या विस्तारीकरणाला कुठलाही विरोध असणार नाही, असा सूर उपस्थित नागरिकांनी काढला.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरच्यावतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मे. उत्तम व्हॅल्यू स्टील्स कंपनीच्या प्रस्तावित क्षमता १.० दशलक्ष ते २.० दशलक्ष टन प्रतिवर्ष विस्तारीकरणावर बुधवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेतली. अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर होते. मंचावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अनिल मोहेकर व संयोजक किरण हसबनीस विराजमान होते. आक्षेपावरुन शाब्दिक रणकंदन झाले, मात्र विस्तारीकरणाला कुणीही विरोध दर्शविला नाही.वणा नदीचे पाणी कंपनीला देणार नाही, अशी भूमिका माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट येथील वणा नदी बचाओ संघर्ष समितीच्या वतीने दिवाकर गमे, आपचे मनोज रुपारेल व प्रमोद भोयर, लोक जनशक्ती पार्टीचे संतोष तिमांडे, दीपक माडे, आफताब खान, नारायण राखुंडे यांनी मांडताना कंपनीच्या विस्तारीकरणाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. तिमांडे यांनी कंपनीला पाणी देण्याचा प्रस्ताव रद्द करावा, हिंगणघाटातील उद्योग, शेती, शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तेव्हा वणाचे पाणी घेऊ नये, असेही मत नोंदविले. गमे यांनी कागदपत्रे दाखवून वणाचे पाणी देण्यास विरोध दर्शविला. हे सांगताना त्यांनी जलसंपदा, पाटबंधारे विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.संदीप किटे, पवनारचे सरपंच राजेश्वर गोंढाळे, बाळा माऊसकर, लहान आर्वीचे कपिल खोडे, इंझापूरचे दीपक तपासे यांच्यासह अन्य काही नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी भूमिका मांडताना विस्तारीकरणाला विरोध नसल्याचेही सांगितले. वर्धेचे उपनगराध्यक्ष कमल कुलधरीया, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, एमआयडीसी वर्धाचे अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, हैद्राबादचे पर्यावरण तज्ज्ञ सुनांदा रेड्डी, रिपाइंचे विजय आगलावे, अख्तर खान, नरेंद्र लोणकर, मकरंद पाठक, चितोडा सरपंच राजकुमारी चक्रधर उपाध्याय, साटोडाचे सदस्य अजय जानवे, नवीन चौधरी, अ‍ॅड. अनिता ठाकरे, भुगावचे सरपंच राजू नाखले यांनी कंपनीच्या विस्तारीकरणाला जाहीर समर्थन दर्शविले. शेखर शेंडे यांनी विस्तारीकरणाला समर्थन दर्शवित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामातच पारदर्शकता नसल्यामुळे अशा जनसुनावणी घेण्याची गरज पडते, असेही मत मांडले. प्रवीण हिवरे म्हणाले, वर्धेत एकही कारखाना नसल्यामुळे बरोजगारीचा प्रश्न बिकट आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी हे सेवाग्रामला आले असता संरक्षक कठडे तोडून त्यांची भेट घेतली व वर्धेत उद्योगाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी गुन्हेही दाखल झाले होते. वर्धेत कारखाना यावा म्हणून आंदोलन झाले. आता त्याच्या विस्तारीकरणाला विरोध असण्याचे कारण नसल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. ज्ञानेश्वर ढगे यांनी बेरोजगारीची समस्या लक्षात घेता कारखान्याच्या विस्तारीकरणाचा विरोध करण्याचे कारण नसल्याचे सांगून जाहीर समर्थन दर्शविले. सर्वप्रथम उत्तम व्हॅल्यू कंपनीने प्रस्तुतीकरणातून कंपनीच्या विस्तारीकरणाची प्राजेक्टरद्वारे सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. पंकज भोयर यांनी पत्र पाठवून विस्तारीकरणाला समर्थन केले.(जिल्हा प्रतिनिधी)