लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळा लागला की सुट्यांमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थी शोधमोहीम राबविली जायची. शिक्षक गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयाचे महत्त्व पटवून देत प्रवेश घेण्यासाठी बाध्य करीत होते. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहायची. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे शिक्षकांच्या विद्यार्थी शोध मोहिमेला ब्रेक लागल्याने पटसंख्येवर त्याचा निश्चितच परिणाम पडणार आहे.शासनाकडून दहा पटसंख्येच्या आतील शाळांना कायमस्वरूपी टाळे लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दहाच्या आतील पटसंख्या असलेल्या शाळांची यादीही जाहीर केली आहे. दरवर्षी शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जायच्या. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शोधार्थ शिक्षक गावोगावी पायपीट करून पालकांच्या काही मागण्या पूर्ण करीत विद्यार्थ्याचा प्रवेश नोंदवून घेत. विद्यार्थ्यांचे पुस्तक, गणवेश, शाळेत येण्या-जाण्याची व्यवस्था आदी सुविधा शाळांकडून आपापल्या परीने दिल्या जात.त्यामुळे शाळेची पटसंख्या कायम ठेवण्यात शाळांना काहीसे यश यायचे. परंतु, यावर्षी कोविड-१९ च्या जागतिक आपत्तीमुळे परीक्षा होण्यापूर्वीच शाळा बंद कराव्या लागल्या. परीक्षा न घेताच निकालही जाहीर केला जात आहे. या संचारबंदीमुळे विद्यार्थी शोधमोहिमही थंडावल्याने शाळेत नवीन प्रवेश मिळविणे आता शिक्षकांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.मराठी शाळांना आशेचा किरणसर्वसामान्यांचाही कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. पण, यावर्षी कोरोना प्रकोपाने जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. परिणामी, अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रवेश शुल्क भरणे, त्यांना सर्व सुविधा पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर परिस्थिती बदलणार आहे. याचाच फायदा मराठी शाळांना होऊन पटसंख्या वाढण्याची शक्यता अधिक असल्याचेही मराठी माध्यमांच्या शिक्षकांकडून बोलले जात आहे.
उन्हाळ्यातील विद्यार्थी शोध मोहिमेत खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST
सर्वसामान्यांचाही कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. पण, यावर्षी कोरोना प्रकोपाने जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. परिणामी, अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रवेश शुल्क भरणे, त्यांना सर्व सुविधा पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर परिस्थिती बदलणार आहे.
उन्हाळ्यातील विद्यार्थी शोध मोहिमेत खोडा
ठळक मुद्देअडचण : पटसंख्या वाढविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान