शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधात बोलणे पडले महागात; शेतकऱ्याच्या तोंडाला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

 केंद्रीय मंत्री गडकरी हे हिंगणघाट येथे १२ डिसेंबरला आले होते. याच्या एक दिवसापूर्वी प्रवीण महाजन याने आ. कुणावार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विदर्भाच्या मुद्द्यावर मागणी करायची असून, निवेदन देऊन त्यांना शाई फासणार असल्याचे सांगितले होते. ती ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. मात्र, त्यानंतर प्रवीण महाजन याने सोशल मीडियावर माफीनाम्याची पोस्टही टाकली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींविरुद्ध बोलणे एका शेतकऱ्याला चांगलेच महाग पडले असून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शेतकऱ्याला घेराव घालून त्याच्याच तोंडाला काळे फासले. ही घटना आरंभा शेतशिवारात घडली. याप्रकरणी शेतकरी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रवीण महाजन हा आरंभा परिसरात असलेल्या शेतशिवारात जनावरांना मलमपट्टी करीत होता. दरम्यान, अज्ञात व्यक्ती आली आणि तुम्ही प्रवीण महाजन आहे का, अशी विचारणा करून तेथून निघून गेला. काही वेळानंतर हिंगणघाट येथील भाजपचा कार्यकर्ता अंकुश ठाकूर आणि त्याचे काही सहकारी एका चारचाकी वाहनातून आले आणि प्रवीणला घेराव घातला आणि प्रवीणला तुम्ही गडकरी साहेबांना काळे फासणार होते असे म्हणून अंकुश ठाकूर याने कानशिलात लगावून हातातील काळ्या पावडरने तोंडाला काळे फासून भाजपच्या नेत्यांविरुद्ध बोलल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.

असे होते प्रकरण...-   केंद्रीय मंत्री गडकरी हे हिंगणघाट येथे १२ डिसेंबरला आले होते. याच्या एक दिवसापूर्वी प्रवीण महाजन याने आ. कुणावार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विदर्भाच्या मुद्द्यावर मागणी करायची असून, निवेदन देऊन त्यांना शाई फासणार असल्याचे सांगितले होते. ती ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. मात्र, त्यानंतर प्रवीण महाजन याने सोशल मीडियावर माफीनाम्याची पोस्टही टाकली होती.

काळे फासल्याचा व्हिडिओ व्हायरल...-  भाजपचे अंकुश ठाकूरसह त्याच्या काही मित्रांनी शेतकरी प्रवीण महाजन यांच्या तोंडाला काळं फासून भाजपच्या मोठ्या नेत्यांची बदनामी करायची नाही, असे म्हणत प्रवीण महाजन यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून दोघेजण प्रवीण महाजन यांच्या तोंडाला काळे फासत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :BJPभाजपा