शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटींचा खर्च, तरी हिंगणीकर तहानलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जाऊन २६ जुलै २०२० रोजी लोकार्पण सोहळासुद्धा थाटामाटात पार पडला. मात्र, वर्ष लोटूनही योजना ठप्प आहे. 

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : योजना कुचकामी ठरल्याची ग्रामस्थांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : पिण्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता दीड कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.  मात्र, वर्षभरापासून ग्रामस्थांना थेंबभरदेखील पाणी मिळाले नसल्याने योजना कुचकामी ठरल्याची  ओरड होऊ लागली आहे.ग्रामपंचायतीची सदस्यीय संख्या १५ असून १० हजार गावाची लोकसंख्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. जलसंकट कायमचे निकाली काढण्याच्या अनुषंगाने शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेकरिता मंजूर केला. तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जाऊन २६ जुलै २०२० रोजी लोकार्पण सोहळासुद्धा थाटामाटात पार पडला. मात्र, वर्ष लोटूनही योजना ठप्प आहे. या योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे संपूर्ण देयके अदा  झाले. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली म्हणून ग्रामस्थांनी अनामत रक्कम भरून नळजोडणीकरिता अर्जसुद्धा केले. मात्र, एक वर्षापासून एक थेंबभरसुद्धा पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. तसेच राम टेकडीवरील बांधण्यात आलेला जलकुंभसुद्धा अद्याप उघडा असून कोरडाच आहे. कोटी रुपये  खर्च करूनही योजना कार्यान्वित न झाल्याने कुचकामी ठरल्याची ओरड आता ग्रामस्थ करीत आहेत. 

आगामी काही दिवसांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत सर्वांना मोफत तीन हजार कनेक्शन देण्यात येणार आहे. हिंगणी येथील एकाही व्यक्तीने एक वर्षापासून नळजोडणीकरिता ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला नाही.-ईश्वर मेश्रे, ग्रामसेवक, हिंगणी.

पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र, वर्ष लोटूनही एकाही घरी नळजोडणी न झाल्यामुळे खंत वाटत आहे. आताही ग्रामस्थांना पावसाळ्यात गढूळ पाणी प्यावे लागत आहे.-अनिस शेख,अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, हिंगणी.

माझ्या कार्यकाळात ५० ते ६० लोकांनी नळजोडणीकरिता अर्ज केले होते. ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांनी अनेकवार येरझारा केल्या. नळजोडणीकरिता अनामत रकमेचा भरणाही केला.  मात्र, ग्रामसेवकाने दखल न घेता अनामत रक्कम परत केली.-शुभांगी मुडे, माजी सरपंच, हिंगणी. 

तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंत पाणी पुरवठायोजनेच्या कागदपत्रांची पूर्तता केल्या गेली नाही. तसेच पाणी टाकीवर लावण्यात आलेल्या पंपाचे ३५ हजार रुपयांचे देयक ग्रामपंचायतीकडे आले असून ते कंत्राटदाराला भरण्यास सांगितले आहे.-दामिनी डेकाटे,  सरपंच, हिंगणी.

 

टॅग्स :Waterपाणी