शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
5
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
6
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
7
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
8
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
9
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
10
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
11
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
12
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
13
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
14
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
15
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
16
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
17
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
18
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
19
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
20
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?

वर्धेतील पाच जणांना केले दोन वर्षांकरिता हद्दपार

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या ...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाईवर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या पाच जणांना वर्धेतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे करण्यात आली. राकेश मुन्ना पांडे (२५), गणेश श्यामराव पेंदोर (२८), दीपक ऊर्फ सोनू विजय वासनिक (२३), अमोल गणेश गेडाम (२४) चौघेही रा. इतवारा बाजार तर सचिन ऊर्फ भुरी श्याम अरखेल (२८) रा. पुलफैल या पाच जणांचा यात समावेश आहे. हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण, दहशत पसरविणे, मारपीट करणे यासह अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हद्दपारीची कारवाई झालेले पाचही जण टोळीने गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा म्होरक्या राकेश पांडे हा होता. गुन्हेगारी टोळीचा बिमोड करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ठाणेदार एम.पी. बुराडे यांनी या पाच जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. एलसीबीने हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. यावर अधीक्षकांनी आदेश काढून या पाच जणांना दोन वर्षाकरिता वर्धेतून हद्दपार केले. या आदेशाच्या अंमलाकरिता शहर ठाण्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)