शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेप की फाशी ? आज होणार शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील नंदोरी चौकात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरणाच्या स्मृतींना आजही उजाळा मिळाल्यावर, प्रत्येक नागरिकाच्या अंगावर शहारे उभे होतात. या प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आहे. पण या प्रकरणातील आरोपीला फाशी की जन्मठेप, याबाबतचा निकाल दोन्ही बाजूचे शिक्षेबाबतचे मत जाणून घेतल्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर. बी. भागवत गुरुवारी जाहीर करणार आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरलेल्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

असा होता घटनाक्रम...

-  हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी पीडित प्राध्यापिका ही बसमधून उतरली. -  पीडिता नंदोरी चौकात येण्यापूर्वी आरोपी विकेश नगराळे याने दुचाकीने हिंगणघाट येथील नंदोरी चौक परिसर गाठला होता. -  बसमधून उतरलेली पीडिता नेहमीप्रमाणे तिच्या महाविद्यालयात काही विद्यार्थिनींसह पायदळ जात असतानाच आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल पीडितेच्या अंगावर फेकत तिला आगीच्या हवाली केले. -   भर चौकात तरुणी जळत असल्याने नंदोरी चौक परिसरात एकच खळबळ उडून परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. याचाच फायदा घेत आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला.-  या घटनेत जखमी झालेल्या प्राध्यापिकेला परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

-  जखमी प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवार १० फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेची प्राणज्योत मालवली.-  दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत आरोपी विकेश नगराळे याला नागपूर पोलिसांच्या मदतीने बुटीबोरी येथून ताब्यात घेत अटक केली. -  विशेष म्हणजे हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असताना, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला अत्याचार प्रकरणाच्या तपासात हयगय केल्यास पोलिसांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.-  तर आता गुरुवारी हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाणार आहे.

पोलिसांनी दिला खडा पहाराहिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने निकालादरम्यान तसेच निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालय भागातील सुमारे १५० मीटरचा परिसर पोलिसांकडून तात्पुरता सील करण्यात आला होता. येथे खुद्द पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह १३ अधिकारी, ९८ कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी खडा पहाराच दिला.

 

टॅग्स :Courtन्यायालय