शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Lok Sabha Election 2019; काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:23 IST

मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी/ वायगांव/ कारंजा (घा.) :मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणुक प्रचारार्थ सेलू तालुक्यातील हिंगणी, वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) व कारंजा (घाडगे) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने २०२२ पर्यंतच्या योजना आखल्या आहेत. प्रत्येक गरीबाला घर दिले जाणार आहे, असे त्यांनी वायगाव येथे सभेत सांगितले.वायगाव येथील सभेला शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, राजेश सराफ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, किरण उरकांदे, रमेश वाळके, संजय गाते, अनंत देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, वायगावचे सरपंच प्रवीण काटकर, मिलिंद भेंडे, किशोर गावळकर उपस्थित होते. हिंगणी येथील सभेला आ. डॉ. पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे यांनी केले. या सभेला मारोतराव मुडे, सोनाली कलोडे, अशोक कलोडे, जि. प. सदस्य राणा रणनवरे, विलास वरटकर, योगेश रणनवरे, योगेश इखार, नरहरी चहांदे, अशोक मुडे, कुंदा खडगी, संजय अवचट, सुनीता ढवळे, नूतन राऊत आदींची उपस्थिती होती.वन्यजीवांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाला भरीव शासकीय मदत देणार - मुनगंटीवारकारंजा (घा.) - येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जंगली श्वापदाकडून शेतीच्या होणाºया नुकसानीला जास्त मदत देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निर्णय घेतल्या जाणार आहे. कारंजा तालुक्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. या सभेला उमेदवार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोरेश्वर भांगे, रेवता धोटे, निता गजाम, सरिता गाखरे, रंजना टिपले, मुकूंदा बारंगे, वसंत भांगे, जि. प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, सुरेश खवशी, गौरीशंकर अग्रवाल, शिरीष भांगे, हरिभाऊ धोटे, चेतना मानमोडे आदींची उपस्थिती होती. संचालन दिलीप जसुटकर यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019