शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:50 IST

जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकपाशीची वाढ प्रचंड : फुल-पात्यांची मात्र कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.लोकमतने जिल्ह्यातील अनेक गावात जावून यासंदर्भात आढावा घेतला. शेतांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली असता यंदा कपाशीचे झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. अतिवृष्टीमुळे निंदनाचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २५० रूपये रोज एका महिला मजूराला द्यावा लागतो.मजूर गावातून शेतात आणण्यासाठी व त्यांना सोडून देण्यासाठी ऑटोरिक्षाला प्रति दिवस ३०० रूपये द्यावे लागतात. फवारणीचा खर्चही दरररोज एक हजार रूपयाच्यावर आहे. पºहाटी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी फुल, पाती मात्र आलेली नाही. दिवाळी, दसºयात दरवर्षी कापूस निघतो. यंदा दसºयात किंवा दिवाळीत सितादेवी होणार नाही, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आता हाताने हॅन्डल मारण्याच्या स्प्रेपंपाने कुणीही फवारणी करायला येत नाही. सर्वांना बॅटरीचा पंप लागतो. तो पंप असेल तरच मजूर कामावर येतात. अन्यथा फवारणीचे काम करण्यास कुणीही तयार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. जे शेतकरी स्वत: शेतात उभे राहून फवारणी करून घेतात, त्यांचे काम ठिक आहे. परंतु इतरांच्या भरोशावर फवारणीचे काम करायचे असेल तर मजूर पंपाचा नोझल मोठा करून तासाभरात फवारणीचे काम उरकवतो, अशी माहिती शेतकºयांनी दिली. एकूणच अति पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.संपूर्ण कुटुंब शेतातग्रामीण भागात फिरत असताना अनेक शेतांमध्ये संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ज्या लोकांनी ठेक्याने व मक्त्याने शेती करण्यासाठी घेतली आहे, त्यांना कदाचित अतिवृष्टीमुळे तोटा येण्याची शक्यता आहे. कारण शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेत उत्पादन होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :floodपूर