शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेलू, देवळी अन् आर्वी तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने बैल पोळ्याच्या दिवशी थांबून थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दमदार हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ४३९.६४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.संत्रासह कपाशीला बसला फटकाकारंजा (घा.) : मुसळधार पावसाचा उभ्या संत्रा पिकाला तसेच कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केल्यास सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा, खापरी या भागातील कपाशी पिकाला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभ्या सोयाबीन पिकाची पावसामुळे नासाडी झाली आहे. या भागातील नुकसानीची पाहणी करून शासकीय मदतीची मागणी होत आहे.नदी-नाले फुल्लरोहणा : मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या परिसरातील कपाशी पिकाची पावसामुळे पातीगळ झाली असून, उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. 

पवनारची धाम नदी फुगलीपवनार : संततधार पावसामुळे येथील धाम नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, सध्या धाम नदी दुथडी भरून वाहात आहे. धाम नदी दुथडी भरून वाहात असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी पाण्याने भरलेल्या नदीचे सौंदर्य बघण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.

शेताला आले तळ्याचे स्वरूप- विरुळ (आकाजी) : विरुळ आकाजी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तसेच शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात साचलेेले पावसाचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, जास्त पाण्यामुळे उभ्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. शिवाय शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

तीन तालुक्यांत अपेक्षित पेक्षा जास्तच बरसलामागील २४ तासांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यात अपेक्षित पेक्षा ११.४० मिमी, देवळी तालुक्यात अपेक्षित पेक्षा ४.५० मिमी तर आर्वी तालुक्यात अपेक्षित पेक्षा तब्बल १८.२५ मिमी जादा पाऊस पडला असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.

कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणामनंदोरी : मुसळधार पावसामुळे उभ्या सोयाबीन तसेच कपाशी पिकाला फटका बसला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महसूल विभागाने पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस