शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दर गुरुवारी वर्धेकर पाळणार ‘नो व्हेईकल डे’

By admin | Updated: December 21, 2015 02:11 IST

सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकांना याची झळ पोहचत आहे.

विविध संघटनांचा बैठकीत निर्धार : ‘लोकमत’ कार्यालयाजवळ एकत्र येऊन करणार शुभारंभवर्धा : सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकांना याची झळ पोहचत आहे. याची सुरुवात स्वत:पासून केल्यास आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला काही प्रमाणात का होईना यापासून वाचवू शकू, अशी खूणगाठ मनाशी बाळगून वर्धेकरांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला ओ देत येत्या गुरुवार (दि.२४ डिसेंबर) पासून वर्धेत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याच वेळी ही चळवळ नित्यनेमाने कायमस्वरुपी राबविण्याचा एकमुखी निर्धारही रविवारी हुतात्मा स्मारक येथे आयोजित बैठकीअंती केला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर प्रामुख्याने हजर होते. ‘नो व्हेईकल डे’बाबत ‘लोकमत’ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून ‘लोक जागर’ केला. याची दखल वर्धेकरांनी पहिल्या दिवसापासून घेणे सुरू केले. बघता बघता याला चळवळीचे स्वरुप वर्धेकरांनी देत ही आपली मोहीम समजून सक्रिय सहभागाची ग्वाही ‘लोकमत’ला दिली. शहरातील ३२ सामाजिक संघटनांसह शासकीय कर्मचारी संघटनाही यासाठी सरसावल्या. हा दिवस सर्वानुमते ठरावा. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने याची अंमलबजावणी करावी. वर्धेतील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी या चळवळीत स्वत: सक्रिय सहभाग घ्यावा, ही बाब विचारात घेऊन आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी पुढाकार घेत आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील हुतात्मा स्मारक येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ठरल्यानुसार अगदी सायंकाळी ४ वाजता शहरातील सक्रिय सहभाग दर्शविलेल्या ३२ संघटनांसह अन्य काही संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून हजेरी लावली. प्रत्येकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद देत ‘नो व्हेईकल डे’वर वैचारिक मुद्दे चर्चेला आणले. यामुळे पर्यावरणाचा बचाव कसा होईल, आपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केले पाहिजे, यासह अनेक गंभीर बाबींवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. यामध्ये दर गुरुवारी शहरात ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. ही संकल्पना ‘लोकमत’ची असल्यामुळे या लोक चळवळीचा शुभारंभही ‘लोकमत’ कार्यालयासमोरुनच सकाळी ८.३० वाजता करण्याचे सर्वानुमते ठरविले. या बैठकीला आम्ही वर्धेकर, वैद्यकीय जनजागृती मंच, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, बहार नेचर फाऊंडेशन, निसर्ग सेवा समिती, न्यू इंग्लिश हायस्कूल, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा एमआयडीसी असोसिएशन, जनहित मंच, जे.बी.सायन्स कॉलेज, भारतीय माजी सैनिक संघ, विदर्भ साहित्य संघ, फुलोरा, प्रहार समाज जागृती संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, किसान अधिकार अभियान, अध्ययन भारती, लायन्स क्लब, नवभारत अध्यापक विद्यालय, यशवंतराव दाते स्मृती संस्था, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.), वर्धा डॉक्टर्स असोसिएशन, एच.एम.ए.आय., वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघ, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, राज्य कर्मचारी संघटना व महसूल संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, स्वामी मुक्तानंद योग समिती या संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे यांनी बैठकीचे संचालन केले.(जिल्हा प्रतिनिधी)