शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिडीचा प्रवासी निवारा कोसळण्याच्या स्थितीत

By admin | Updated: August 29, 2014 00:02 IST

स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही.

भिडी : स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता या समस्येची दखल घेऊन येथे नवीन प्रवासी निवारा बांधावा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.भिडी बसस्थानक हे परिसरातील नागरिकांकरिता महत्त्वाचे आहे. नागपूर-यवतमाळ या राज्य मार्गावर भिडी गाव येते. या गावावरुन यवतमाळ, माहुर, मरठवाडा तसेच वर्धा, नागपूर येथे जाण्याकरिता बसगाड्या मिळतात. शिअवाय येथे काही जलद बसगाड्यांचे थांबे देण्यात आले आहे. यामुळे जवळपास २० ते २५ गावातील प्रवासी येथील बसथांब्यावरून गाडी घेतात. येथील प्रवासी निवाऱ्यावरुन परिसरातील गावाकडे जाण्याकरिता बस मिळते. यामुळे १० ते १२ खेड्यावरील प्रवासी येथून ये-जा करतात. येथील प्रवासी निवाऱ्यावर कायम वर्दळ असते. दररोज येथून ४०० ते ५०० प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे येथील प्रवासी निवारा महत्त्वाचा आहे. परिवहन मंडळाला भिडी स्थानकावरुन चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. परंतु येथे सुविधा देण्याकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येतो. स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. ती भिंत केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे. तरीही त्याची साधी डागडूजी केली जात नाही. यासह येथे प्रवाशांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही. येथे दिवसाला अनेक प्रवासी येतात तरीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. प्रवासी निवाऱ्याची दैनावस्था प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरु शकते. विशेषत: विद्याथी या प्रवासी निवाऱ्यात थांबत असतात. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी येथील प्रवासी निवारा त्वरीत बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थ व प्रवाश्यांची मागणी आहे. संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही अरुन प्रवासी, विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)