लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : अनेक वर्षांपासून मिळेल ते उष्टे, शिळे अन्न खाऊन पोट भरणाऱ्या पारधी समाजावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराई ठप्प असल्याने उपासमारीचे संकट ओढवले असल्याचे चित्र आहे.एप्रिल, मे आणि जून हे तीन महिन्यांत दरवर्षी लग्नसराईची धामधूम असते. यंदा मात्र, विवाह सोहळे ठप्प आणि झालेच तर आटोपशीर. यामुळे या व्यवसायावर निर्भर सर्वच संकटांच्या गर्तेत सापडले. अन्नासाठी भटकंती करणाऱ्या पारधी समाजबांधवांचीही तीच अवस्था झाली. आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. यावरच ते पोट भरतात. जे आपण फेकतो ते अन्न हा समाज आनंदाने स्वीकारतो आणि त्यावर आपली उपजीविका करतो. पोळ्यांचे तुकडे वाळवत अनेक दिवस खाऊन गुजराण करतात. आजही या मुलांच्या अंगावर धड कपडे नाही, जुने कोणीतरी दिलेले कपडे ते वापरतात. राहण्यास हक्काची जागाच नाही.येथील कन्या शाळेसमोर मोकळ्या मैदानावर रात्रंदिवस ऊन, पाऊस असो थंडी असो, निसर्गाशी एकरूप होत हे लोक राहतात. या समाजाकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहिले जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.पारध व्यवसायावरून या जातीला पारधी हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. शिकारीव्यतिरिक्त दगडी साहित्य बनविणे, औषधी वनस्पती विकणे, मोलमजुरी करणे हे त्यांचे मुख्य व्यवसाय होते. पारधी वाघरी बोलीभाषा बोलतात. पण आता त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता कोविड-१९ च्या विषाणूच्या प्रादुभार्वाने सर्वत्र लॉकडाऊन आहे त्यामुळे विवाह सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर काही महिने उपजीविका असणाºया या पारधी समाजाचीही विदारक अवस्था आहे.
शिळ्या पोळ्या, अन्नही संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST
आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. यावरच ते पोट भरतात. जे आपण फेकतो ते अन्न हा समाज आनंदाने स्वीकारतो आणि त्यावर आपली उपजीविका करतो.
शिळ्या पोळ्या, अन्नही संपले
ठळक मुद्देआता पोट कसे भरायचे? : पारधी समाजापुढे उभे ठाकले संकट