शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळातही देवळीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची उपेक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील सुविधांअभावी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्या रुग्णालयात तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्राप्त झाले असून त्याची ट्रायल सुरु आहे.

ठळक मुद्देसात वर्षांपासून सुविधांचा अभाव : अपुरे मनुष्यबळावर डोलारा

हरिदास ढोकलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथे ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत असून गेल्या सात वर्षांपासून सोयी-सुविधांचा अभाव आणि अल्प मनुष्यबळ असल्याने रुग्णांच्या उपचारापासून तर दाखल करुन घेण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या कोरोनाच्या महामारीतही गेल्या वर्षभरात येथे ना रुग्णवाहिका मिळाली ना ऑक्सिजन सिलिंडरचा आवश्यक पुरवठा झाला. त्यामुळे रुग्णांची उपेक्षा अद्यापही कायमच आहे.कोरोनाकाळात येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील सुविधांअभावी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्या रुग्णालयात तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्राप्त झाले असून त्याची ट्रायल सुरु आहे. या रुग्णाला कोरोनाबाधितांना दाखल करुन घेण्याची तरतूद नसल्याने येथे व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयात सुरुवातीपासून मनुष्यबळाचा तुटवडा आहेत. शासनाच्या आराखड्यानुसार येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २७ जागा मंजूर असताना सध्या १३ कर्मचाऱ्यांच्या भरोवश्यावर रुग्णालयाचा डोलारा सांभाळल्या जात आहे. सहाय क अधीक्षक, दंतचिकित्सक, दोन कनिष्ठ लिपिक, दोन अधिपरिचरिका, चार वॉर्डबॉय, दंतचिकित्सक सहायक, शिपाई व दोन सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात साधी जनरेटरचीही व्यवस्था नसल्याने लाईट गेल्यानंतर संपूर्ण परिसरात काळोख पसरतो. परिणामी सर्व विद्युत उपकरणे या काळात निकामी ठरतात. येथील कालबाह्य एक्सरे मशीनच्या अनेक तक्रारी असल्याने शंभर मिली अ‍ॅम्पीयरची नवीन एक्सरे मशीन सेवेत आणली. या मशीनमध्ये मणक्याचे एक्सरे स्पष्ट येत नसल्याने पाचशे मिली अ‍ॅम्पीयरच्या मशीनची मागणी आहे. तसेच पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने रुग्ण कल्याण समिती व त्यामार्फत चालणारे सर्व काम थांबलेले आहे.

या व्यवस्थेवर दिला जातोय भर

कोरोनाच्या तिसºया लाटेची पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल होण्याची व्यवस्था होईपर्यंत या रुग्णालयात ऑक्सिजन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता नऊ सिलिंडर, तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती केली आहे.स्थानिक औद्योगिक वसाहतीतील सामाजिक न्याय भवन येथे ५० बेडचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र प्रस्तावित आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था राहणार आहे. ऑक्सिजन पातळी ९० ते ९४ पर्यंत असणाºया रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे. त्यांच्या सेवेत ३ वैद्यकीय अधिकारी व परिचारिका राहणार असून गंभीर रुग्णांन हलविण्यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली जाणार आहे. शासनाकडून या सर्व सेवा कंत्राटी पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत.रुग्णांची संख्या वाढताना दिसताच ग्रामीण भागातील रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्यास अडचणी निर्माण होत असल्याने इसापूर येथे खासदार रामदास तडस आणि महालक्ष्मी कंपनीच्या माध्यमातून १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल